ETV Bharat / city

सांताक्रूझमधून 12 कोटीचे अमली पदार्थ जप्त; मुंबईच्या डोंगरी पोलिसांची कारवाई

पोलिसांनी सांताक्रूझमधील वाकोला भागातल्या एका घरातून कोट्यवधी रुपयांची अमली पदार्थ जप्त केले. साडे 12 कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्स, या व्यतिरिक्त औषधांची पाकिटे, आणि १० किलो वजनाची मशीन आणि पाच लाख रोख रक्कम असा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.

author img

By

Published : Feb 22, 2021, 9:10 AM IST

Dongri Police seizes MD drugs
अमली पदार्थ जप्त

मुंबई - शहरात पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून मोठ्याप्रमाणात छापेमारीचे सत्र सुरू आहे. शनिवारी डोंगरी पोलिसांनी सांताक्रूझ भागात मारलेल्या एका छाप्यात तब्बल साडेबारा कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी घाटकोपरमधील एका ड्रग्स पेडलरला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही छापेमारी करण्यात आली. दीपक बंगेरा असे त्याचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच लाख रुपये रोकडही हस्तगत केली आहे.

सांताक्रूझमधून 12 कोटीचे अमली पदार्थ जप्त

सांताक्रूझमधील वाकोला भागात कारवाई

डोंगरी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक शबाना शेख या कारवाई बाबत बोलताना सांगितले की, दीपक बंगेरा याचाकडे सलग 48 तास विचारपूस करण्यात आली. त्या चौकशीत सांताक्रुझमध्ये ड्रग्ज ठेवण्यात आल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी सांताक्रूझमधील वाकोला भागातल्या एका घरातून कोट्यवधी रुपयांची अमली पदार्थ जप्त केले. साडे 12 कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्स, या व्यतिरिक्त औषधांची पाकिटे, आणि १० किलो वजनाची मशीन आणि पाच लाख रोख रक्कम असा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.

मोठी साखळी कार्यरत-

या प्रकरणात मुंबईच्या डोंगरी पोलिसांनी प्रथम 18 फेब्रुवारीला 12 ग्रॅम एमडी ड्रग्ससह ड्रग पेडलर इशाक इक्बाल याला अटक केली होती. त्याच दिवशी नवी मुंबईच्या वाशी भागात छापा टाकत इशाकचा साथीदार अब्दुल वसीम याला 60 ग्रॅम एमडी ड्रग्ससह पकडण्यात आले. या दोघांच्या चौकशीत दिपक बंगेरा नावाच्या व्यक्ती इशाकचा अगदी जवळचा सहकारी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी २० फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर हा अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. ही टोळी कोणत्या भागात अमलीपदार्थ पुरवठा करते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणले कुठून आणले याचा तपास पोलीस घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.