ETV Bharat / city

ज्ञानदेव वानखेडेंची उच्च न्यायालयाला अपील; नवाब मलिकांविरोधात 2 सदस्य खंडपीठासमोर सुनावणीची मागणी - ज्ञानदेव वानखडे

मुंबई उच्च न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede appeal) यांच्या मंत्री नवाब मलिक विरोधातील याचिकेवर कुठलाही दिलासा दिला नाही. त्यामुळे, आता या प्रकरणाची सुनावणी दोन सदस्य खंडपीठाकडे व्हावी, अशी अपील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede appeal bombay high court) यांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे.

Dnyandev Wankhede appeal
ज्ञानदेव वानखेडे मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Nov 24, 2021, 9:44 PM IST

Updated : Nov 24, 2021, 10:44 PM IST

मुंबई - समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede appeal) यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपण किंवा आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात कोणतीही वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर करू नयेत किंवा कोणतेही आरोप करू नयेत, या करिता मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे यांना कुठलाही दिलासा दिला नाही. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी दोन सदस्य खंडपीठाकडे व्हावी, अशी अपील एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede appeal bombay high court) यांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे.

हेही वाचा - रविवारी मुंबईत होणार संयुक्त शेतकरी महापंचायत, महाविकास आघाडीची लाभणार साथ

ज्ञानदेव वानखडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन सदस्य खंडपीठाकडे या विषयाची त्वरीत सुनावणी घ्यावी, अशी मागणी आपल्या याचिकेत केली आहे. त्यांची ही याचिका न्या. कथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणीला येण्याची शक्‍यता आहे. सोमवारी न्या. माधव जमादार यांच्या एक सदस्य खंडपीठाने वानखेडे याची अपील फेटाळून लावत नवाब मलिक यांच्या वक्तव्यांवर सरसकट बंदी घालता येणार नाही, असे म्हटले होते.

वानखेडे यांनी आपला मुलगा आणि कुटुंबाबत वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यास मलिक यांना विरोध करण्याची मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने अशा पोस्ट न करण्यास मनाई न करता उलट अशा पोस्टमध्ये प्रथमदर्शनी सत्य असल्याचे वाटत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्यामुळे, आता या निर्णयाला ज्ञानदेव वानखेडे यांनी दोन सदस्य खंडपीठासमोर आव्हान दिले आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करा- अजित पवारांचे निर्देश

Last Updated : Nov 24, 2021, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.