मुंबई - तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांचे आज सोमवारी विधानसभेत निलंबन करण्यात आले. भाजपच्या आमदारांनी आता राज्यपालांची भेट घेतली. आधीच राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांचा तिढा अजून सुटला नसताना आता आणखी बारा आमदारांचा वाद राज्यपालांच्या दरबारी पोहोचला आहे.
राज्यपालांकडे दाद मागणार
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने- सामने आले. सभागृहाबाहेर देखील तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या कार्यालयात घुसून गैरवर्तन केले. या कारणावरून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले. या निलंबामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता हे सर्वच्या सर्व निलंबित आमदार राज्यपालांची भेट घेऊन दाद मागणार आहेत. तर ठाकरे सरकारने राज्यपालांकडे पत्राद्वारे तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
12 का बदला 12 से
ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. काही आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली. त्यामुळे अध्यक्ष प्रचंड संतप्त झाले होते. परिणामी या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. मात्र या निलंबानंतर ठाकरे सरकारने 12 आमदारांचे निलंबन करून बदला घेतला की, काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
हेही वाचा - भाजपाचे 12 आमदार एक वर्षासाठी निलंबित; विधानसभा अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरण