ETV Bharat / city

Dismissal ST workers - शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना एकनाथ शिंदेंकडून मोठा दिलासा - सिल्वर ओक हल्ला

एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनेक मागण्यांसाठी मागील वर्षी ऐन दिवाळीत संप पुकारला होता. मागण्या पूर्ण न झाल्याने संपाने हिंसक वळण घेतले होते. संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला होता ( ST workers had attacked the house of NCP president Sharad Pawar ). परिणामी या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ ( Dismissal ST workers ) केले होते. मात्र त्या एसटी कर्मचाऱ्यांसह 118 बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा एसटी महामंडळात सेवेत रूप करून घेण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे.

Dismissal ST workers join the service again attacked Sharad Pawar's house
शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आहे.
author img

By

Published : Oct 9, 2022, 12:12 PM IST

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनेक मागण्यांसाठी मागील वर्षी ऐन दिवाळीत संप पुकारला होता. मागण्या पूर्ण न झाल्याने संपाने हिंसक वळण घेतले होते. संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला ( ST workers had attacked the house of NCP president Sharad Pawar ) होता. परिणामी या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले होते. मात्र त्या एसटी कर्मचाऱ्यांसह 118 बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा एसटी महामंडळात सेवेत रूप करून घेण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे.एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गूनरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत रुजू केल्या जाणार ( Dismissal ST workers join the service again attacked Sharad Pawar's house )असल्याची माहिती दिली आहे.

दिवाळात पुकारला होता संप - गेल्या वर्षी एन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तेव्हाच तात्कालीन महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलो होतो. जवळपास साडेसहा ते सात महिने एसटी कर्मचाऱ्यांचा हा संपत चालला होता त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा देखील सहन करावा लागला. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी तात्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या.

सिल्वर ओकवर हल्ला - आपल्या मागण्या पूर्ण न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक घरावरच हल्ला केला होता. त्यां एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला त्या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काली परिवहन मंत्री अनिल परब यांनी सेवेतून बडतर्फ केलं होतं. तसेच त्या कामगारांना पुन्हा कधीही सेवेत रुजू केलं जाणार नाही असा निर्णय घेतला होता.

परिवहन खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे- नव्या सरकारमध्ये परिवहन खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ 118 कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा एसटी सेवेमध्ये रुजू करण्याचा निर्णय खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेतला असून याबाबत मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या बाबतची अधिक बैठक बोलावली होती या बैठकीनंतर ऍड. सदावर्ते यांच्याशी देखील त्यांना याबाबत चर्चा केली. शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याच्या प्रकरणात ज्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तसेच या हल्ल्याबाबत एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणोत्तर सदावर्ते यांच्यावरही कारवाई झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.