ETV Bharat / headlines

Radhakrishna Vikhe Patil : मंत्रिपदासह विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चेत

राधाकृष्ण विखे पाटील यांचे नगरच्या राजकारणात ( In The Politics of Nagar )मोठे प्रस्थ आहे. सहकार क्षेत्रामध्ये विखे पाटील घराण्याचे मोठे योगदान आहे. राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी शिर्डी मतदारसंघातून ( From Shirdi Constituency ) 1994 ( In 1994 )साली प्रथम निवडणूक लढवली त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. आता विधानसभा अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा आहे.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Jul 1, 2022, 12:53 PM IST

Updated : Aug 9, 2022, 7:46 AM IST

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel Leader Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्री पदाची व भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Devendra Fadwanis ) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रीपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव ( Post of Speaker of The Legislative Assembly )चर्चेत आहे. विखे-पाटील घराणे हे नगरच्या राजकारणावर ठाण मांडले असलेले घराणे आहे. विखे-पाटील घराण्यातील तिसरी पिढीही आता राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि लौकीक आहे. आमदार राधाकृष्ण विखे-पाटील हे राज्यातील बडे नेते ( Big Leaders in The State ) असून, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.

लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू : राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जन्म १५ जून १९५९ मध्ये झाला. सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात जन्मलेल्या राधाकृष्ण विखे यांना लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू मिळालेलं होतं. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे राज्यातील पहिले पब्लिक स्कूल प्रवरानगरला सुरू केले. याच पब्लिक स्कूलमध्ये राधाकृष्ण विखे यांना पहिलीत प्रवेश देण्यात आला. आजोबांच्या आग्रहाखातरच त्यांना वसतिगृहात घालण्यात आले. तिथूनच राधाकृष्ण विखे त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण झाली.

सहकार क्षेत्रात मोठ योगदान : या पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी इयत्ता अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अकरावीनंतर धुळे, कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना ते सामाजिक कार्याकडे ओढले गेले. कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी संपही केला होता. विखे घराण्याने नगरमध्ये सहकार क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगरमध्ये सुरू केला. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला. सहकार, समाजकारण आणि राजकारणात विखे-पाटील घराण्याचे मोठे योगदान आहे.

काँग्रेसमधून राजकीय प्रवासाला सुरुवात : राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली. १९८६ मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. या काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायी दिंडी काढली. विखे यांच्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने ९० च्या दशकात सुरू झाली. त्यांनी १९९४ मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आजही या मतदारसंघाचे ते निर्विवादपणे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुलासोबत भाजपमध्ये प्रवेश : राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. वडिलांपाठोपाठ राधाकृष्ण विखे यांनीही आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही शिवसेनेत प्रवेश करावा लागला होता.

याच इतिहासाची पुनरावृत्ती 2019 मध्ये पाहायला मिळाली : या इतिहासाची पुनरावृत्ती २०१९ मध्ये पहायला मिळाली, पण थोड्या फरकाने. आधी वडिलासोबत मुलाला शिवसेनेत जावं लागलं. तर २०१९ मध्ये मुलासोबत वडिलांना भाजपमध्ये जावं लागलं. २०१९ मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते असतानाही विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राधाकृष्ण विखे यांनी मुलासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या अर्थाने ही इतिहासाची पुनरावृत्तीच समजली जाते.

महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री : राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कृषीमंत्री झाले होते. २००९ पासून ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजीनामा देण्याआधी ते काँग्रेसचे विधानसभेतील नेते होते. अहमदनगरमधील प्रवरा शिक्षण प्रसारक संस्थेचे ते प्रमुख आहेत.

हेही वाचा : Sanjay Raut on Shinde Fadnavis Government : देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखविले असते तर...संजय राऊत यांचे मोठे विधान

Last Updated : Aug 9, 2022, 7:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.