ETV Bharat / city

Deepak Kesarkar Appeal to MLA : द्रौपदी मुर्मू यांना सर्व आमदार, खासदारांनी मतभेद विसरून मतदान करावे- दीपक केसरकर - Deepak Kesarkar Appeal to MLA

एनडीए राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू ( NDA presidential candidate Draupadi Murmu ) यांना सर्व आमदार, खासदारांनी मतभेद विसरून मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर ( MLA Deepak Kesarkar ) यांनी आज केले. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

KESARKAR ON MURM
KESARKAR ON MURM
author img

By

Published : Jul 5, 2022, 10:04 PM IST

मुंबई - देशाच्या सर्वोच्च पदावर एक आदिवासी समाजातील आणि त्यासोबत उच्चशिक्षित महिला जाणार असेल तर प्रत्येकाने आपल्या मनात कोणताही किंतु परंतु न बाळगता त्यांना मोठ्या मनाने मतदान करायला हवे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर ( MLA Deepak Kesarkar ) यांनी म्हटले आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्म ( NDA presidential candidate Draupadi Murmu ) यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा दिला होता पाठिंबा! - केसरकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महिला धोरणाविषयी पुढाकार घेऊन ते अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता एक आदिवासी समाजाची त्याचबरोबर उच्चशिक्षित महिला देशाची राष्ट्रपती होत असतील तर सर्वांनी त्यांना किंतु परंतु न करता पाठिंबा देणे गरजेचे आहे. या अगोदर माजी राष्ट्रपती महाराष्ट्राच्या कन्या प्रतिभाताई पाटील यांना सुद्धा सर्वांनी एकमताने पाठिंबा देत राष्ट्रपती पदासाठी निवडून दिले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला होता. त्याच पद्धतीने यंदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्म यांना सर्वांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. याबाबत केंद्रातील भाजपचे नेते कदाचित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना विनंती करू शकतात. काल आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये व्हीसीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्म यांचा प्रचार कसा करायचा यावर चर्चा झाली. पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याची ही वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांच्या वतीने सर्वांनी मदत करावी अशी मी विनंती करतो, असेही केसरकर म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी वाटपात दुजाभाव झालाच आहे? - राज्यात झालेल्या सत्तांतरावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली टीम बनत आहे. लोकांच्या मनातील गैरसमज दूर झाले आहेत. सर्वात अगोदर पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय हे सरकार घेणार आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेच आहे. देवेंद्र फडवणीस हे फार हुशार आहेत. राज्यातील बुद्धिवान लोकांपैकी ते एक असल्याचेही केसरकर म्हणाले. ज्या दिवशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी बहुमताचा ठराव पारित केला त्याच दिवशी विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा झाली. ते दिलदार आहेत. ते फार मोठ्या मनाचे आहेत. या कारणासाठी त्यांची यापदी निवड झाल्याचा मला आनंद झाला. परंतु निधी वाटपाबाबत ते अर्थमंत्री असताना त्यांनी कुठलाही दुजाभाव केला नाही हे त्यांचं सांगणं हे चुकीचं आहे. मंत्र्यांच्या मतदारसंघाला निधी भेटला म्हणजे सर्वांना भेटला असं नाही. एकट्या बारामतीला ८५८ कोटी रुपये नगर विकास विभागाला निधी भेटला आहे. मी अजितदादा यांच्यावर टीका करत नाही. परंतु वस्तुस्थिती महाराष्ट्राला समजली पाहिजे म्हणून मी हे बोलत आहे. मी पक्षाच्या बाहेर जाऊन त्यांच्यावर प्रेम करतो, तसे ते अजित पवार आहेत, असेही केसरकर यांनी याप्रसंगी सांगितलं. आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याने बाळासाहेब यांच स्वप्न पूर्ण झालं असून शाखाप्रमुख मुख्यमंत्री झाले याचा त्यांना जास्त आनंद आहे.

१५ मतदार संघात निवडणुका लागू शकतात? - राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले आहेत की, मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या आमदारांना तयार राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत. या विषयावर बोलताना केसरकर म्हणाले की, मध्यावधी निवडणुका लागतील याची मला खात्री नाही, परंतु १५ मतदारसंघांमध्ये विधानसभेच्या लागतील हे होऊ शकतं. आम्हाला कुठल्याही आमदाराला आमदारकी पदावरून दूर करायचं नाही आहे. परंतु जर कोणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असं सांगत दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांचा गट याच्यामध्ये जी काही चुरस रंगली आहे, त्याला आरपार उत्तर देण्याचं त्यांनी ठरवलं असल्याचं त्यांच्या उत्तरातून सांगितलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.