ETV Bharat / city

Deccan Queen Express : डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचे डायनिंग कार मुंबईत दाखल

मुंबई ते पुण्यादरम्यान दररोज दररोज धावणाऱ्या आणि चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस नवीन डायनिंग कोच नुकताच चेन्नई येथून इंटिग्रल कोच फॅक्टरी ( Integral Coach Factory ) मधून निघून मुंबईत दाखल झाला आहेत. त्यामुळे आता लवकरच नवीन कोरी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ( Deccan Queen Express ) धावायला सज्ज झाली आहेत.

रेल्वे
रेल्वे
author img

By

Published : Apr 20, 2022, 7:53 PM IST

मुंबई - मुंबई ते पुण्यादरम्यान दररोज दररोज धावणाऱ्या आणि चाकरमान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस नवीन डायनिंग कोच नुकताच चेन्नई येथून इंटिग्रल कोच फॅक्टरी ( Integral Coach Factory ) मधून निघून मुंबईत दाखल झाला आहेत. त्यामुळे आता लवकरच नवीन कोरी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ( Deccan Queen Express ) धावायला सज्ज झाली आहेत.

देशातील पहिला डायनिंग कोच - रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेमध्ये प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक रेल्वे, असा मान मुंबई-पुणे डेक्कन क्वीनला आहे. या गाडीला चाकरमानी दख्खनची राणी ( Deccan Queen Express ) म्हणून संबोधतात. जून, 1930 पासून डेक्कन क्वीन हे मुंबई ते पुणे दरम्यान धावत आहे. तेव्हापासून या गाडीला डायनिंग कार ( Dining car ) आहे. दोन वर्षांपूर्वी या दख्खनची राणीला अत्याधुनिक लिंक-हॉफमन-बुश ( एलएचबी ) डबे लावण्याची योजना रेल्वेने आखली होती. मात्र, डायनिंग डब्यामुळे एलएचबी डबे जोडण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, आता या अडचणींवर मात करून एलएचबी बनावटीची डायनिंग कार तयार करण्यात आली आहे. डेक्कन क्वीनला भारतीय रेल्वेमधील एलएचबी डायनिंग कार असलेली पहिली ट्रेनचा मान मिळणार आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी ( आयसीएफ ) मधून डेक्कन क्वीनचे 16 डबे तयारहून दीड महिन्यापूर्वीच मुंबईत दाखल झाले आहे. बुधवारी (दि. 19 एप्रिल) चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून डायनिंग कोच मुंबई दाखल झाली आहे. लवकरच मुंबई ते पुणे दरम्यान नवीन डेक्कन क्वीन धावणार आहे.

असा असणार डायनिक कार - नवीन डायनिंग कार ही अपघातरोधक असणार आहे. एलएचबी डब्यांमुळे अपघाताची तीव्रता कमी होणार आहे. तर, डायनिंग कारमध्ये 10 टेबल असणार आहेत. यावर 40 प्रवासी बसू शकतील. तसेच नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या पसंतीचे खाद्यपदार्थ प्रवाशांना मिळणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

नवीन रंगात धावणार डेक्कन क्वीन - या ऐतिहासिक डेक्कन क्वीनचा रंगही बदलण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाने डेक्कन क्वीनसाठी लाल, हिरव्या आणि पिवळ्या पट्ट्यांसह 'प्रतिबंधित इम्प्रेरियम' रंगाची छटा देण्यात आली आहेत. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ( National Institute of Design ) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डेक्कन क्वीनने प्रवास करुन नियमित प्रवाशांशी संवाद साधल्यानंतरच रंग निश्चित करण्यात आला आहे.

हेही वाचा - सहा महिन्यानंतर प्रथमच एसटी सेवा पूर्वपदावर - अनिल परब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.