मुंबई - राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना मंत्र्यांची कार्यालयेदेखील कोरोनाच्या विळख्यात ( corona infection in Ministers office ) झालेली पाहायला मिळतात. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या ( Dilip Walse Patils 20 employees corona infected ) कार्यालयातील 20 कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालय आणि घरी एकूण 22 कर्मचारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली ( Chagan Bhujbal employees corona infection ) असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामध्ये खासकरून फ्रन्टलाइन वर्कर असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा-Anil Parab on ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही - परिवहनमंत्री अनिल परब
कर्मचाऱ्यांच्या संपर्कात मंत्रीदेखील आले का?
मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारीदेखील मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याने मंत्रालय परिसरातही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचारी कोरोनाबाधित होत असताना या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात मंत्रीदेखील आले आहेत का ? याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम-
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 55 वर्षांपेक्षा अधिक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुरुवारपासून ( 7 जानेवारी ) वर्क फ्रॉम होम देण्याची ( police work from home in Maharashtra ) घोषणा केली होती. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावात पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने बाधित होत आहे. ही बाब लक्षात घेता गृहमंत्रालयाने पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गुरुवारी दिली होती.
हेही वाचा-Anil Deshmukh in Jail : अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील वाढला मुक्काम; पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार