ETV Bharat / city

Self Test Kit in Mumbai : ३ लाखापैकी ९८ हजार ९५७ चाचण्यांचे अहवाल, इतरांचे अहवाल गायब - मुंबईत सेल्फ टेस्ट किट चाचण्यांमध्ये गोंधळ

आपली चाचणी केल्यास कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) येण्याची भीती असल्याने लाखो मुंबईकरांनी सेल्फ टेस्ट किटच्या (Self Test Kit) माध्यमातून चाचण्या केल्या आहेत. मुंबईत सुमारे ३ लाख अशा किट विकण्यात आल्या असून त्यामधील ९८ हजार ९५७ नागरिकांनीच आपले अहवाल ऍपवर अपलोड केल्याने पालिकेकडे त्यांची नोंद आहे.

self testing kit
सेल्फ टेस्ट किट
author img

By

Published : Jan 12, 2022, 5:44 PM IST

Updated : Jan 12, 2022, 10:06 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये डिसेंबरपासून कोरोनाचा प्रसार (Corona Spread) पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आपली चाचणी केल्यास कोरोना पॉझिटिव्ह येण्याची भीती असल्याने लाखो मुंबईकरांनी सेल्फ टेस्ट किटच्या (Self Test Kit) माध्यमातून चाचण्या केल्या. मुंबईत सुमारे ३ लाख अशा किट विकण्यात आल्या असून त्यामधील ९८ हजार ९५७ नागरिकांनीच आपले अहवाल ऍपवर अपलोड केल्याने पालिकेकडे त्यांची नोंद आहे. इतरांच्या म्हणजेच तब्बल २ लाख लोकांच्या अहवालाची नोंदच झाली नसल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे.

सुरेश काकाणी - अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
  • सेल्फ टेस्टिंग किटचा वापर -

मुंबईमध्ये डिसेंबरपासून कोरोनाचा प्रसार सुरु झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट आली असून मुंबईमधील प्रत्येक व्यक्ती आजाराने त्रस्त झाला आहे. अशातच नागरिकांना आपण कोरोना चाचणी केल्यास पॉजिटीव्ह येऊन क्वारंटाईन केले जाईल अशी भीती असल्याने नागरिकांनी आपली स्वतःची चाचणी करण्यासाठी सेल्फ टेस्टिंग किटचा आधार घेतला आहे. मुंबईमध्ये अशा ३ लाखाहून अधिक किट विकल्या गेल्याची माहिती आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ९८ हजार ९५७ नागरिकांनी अशी टेस्ट केली असून त्यामधून ३ हजार १४९ नागरिक कोरोना पॉजिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. इतरांनी आपली माहिती पालिकेकडे दिली नसल्याचे समोर आले आहे.

  • आपली माहिती अपलोड करा -

सेल्फ टेस्ट किटमधून चाचण्या केलेल्या लोंकाची माहिती समोर येत नसल्याबाबत पालिकेशी संपर्क साधला असता, ज्या नागरिकांनी अशा चाचण्या केल्या आहेत त्यांनी आपली माहिती सेल्फ टेस्ट किटच्या ऍपवर अपलोड करावी असे आवाहन केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. किट बनवणारे मॅनुफॅक्चरर आणि डिस्ट्रिब्युटर यांना किट कोण विकत घेत आहे त्याचे नाव, त्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मॅनुफॅक्चरर आणि डिस्ट्रिब्युटर यांनी ती माहिती पालिकेला द्यावी असे सांगण्यात आले आहे. ज्यांना या किट विकल्या आहेत त्यांची माहिती मिळाल्यास पालिकेला त्यांच्यापर्यंत पोहचता येईल. गेल्या दहा दिवसात २५ हजार किट आल्या आहेत. त्यांच्यापैकी काहीही आपली माहिती अपलोड केली आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

  • आSरटीपीसीआर चाचण्या करा -

जे नागरिक सेल्फ टेस्टिंग किटच्या माध्यमातून कोरोना चाचण्या करत आहेत त्यांनी आपले अहवाल त्याच्या ऍपवर अपलोड केल्याने त्यांची माहिती पालिकेला मिळणार आहे. यामुळे त्यांच्यावर वेळेवर उपचार करता येणे शक्य होणार आहे. ज्यांनी टेस्ट केल्या आहेत त्यांनी त्या टेस्टच्या अहवालावर निर्भर न राहात आरटीपीसीआर चाचण्या करून घ्याव्यात. कोरोना पॉजिटीव्ह असल्याचे आरटीपीसीआर चाचणीमधूनच समोर येते असेही काकाणी म्हणाले.

Last Updated : Jan 12, 2022, 10:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.