ETV Bharat / city

Dhananjay Mahadik : देवेंद्र फडणवीस हेच आजच्या विजयाचे खरे शिल्पकार : धनंजय महाडिक - प्रवीण दरेकर

आजच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी टीम ( Team Devendra Fadnavis ) आहे. त्यामध्ये अध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP Leader Chandrakant Patil ) , आशिष शेलार ( BJP Leader Ashish Shelar ) , गिरीष महाजन ( Girish Mahajan ) , प्रसाद लाड ( Prasad Lad ) , प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) या सगळ्या मंडळींनी या निवडणुकीमध्ये खूप मेहनत ( RS Election 2022 ) घेतली. कठोर परिश्रम घेतले, त्याचा फायदा झाला. मुळात ही निवडणूक खूप अवघड, मोठी आणि खूप कठीण होती. अशा स्थितीत आम्ही जिंकून आलो, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

Dhananjay Mahadik
धनंजय महाडिक
author img

By

Published : Jun 11, 2022, 8:05 AM IST

Updated : Jun 11, 2022, 9:26 AM IST

मुंबई - संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजपच्या तीन उमेदवारांनी बाजी मारली. यामध्ये महाविकास आघाडीच्या संजय पवार यांचा पराभव झाला. या संपूर्ण विजयाचे शिल्पकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. जनतेच्या समस्या आगामी काळात राज्यसभेत प्रभावीपणे मांडू अशी, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मतदान झाले. 285 आमदाराने यासाठी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. अटीतटीची मानली जाणारी कोल्हापूर मधील दोन उमेदवारांची खरी लढत निवडणुकीत पाहायला मिळाली. भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा यावेळी दारुण पराभव केला. यानंतर महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

धनंजय महाडिक

आजच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी टीम ( Team Devendra Fadnavis ) आहे. त्यामध्ये अध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP Leader Chandrakant Patil ) , आशिष शेलार ( BJP Leader Ashish Shelar ) , गिरीष महाजन ( Girish Mahajan ) , प्रसाद लाड ( Prasad Lad ) , प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) या सगळ्या मंडळींनी या निवडणुकीमध्ये खूप मेहनत ( RS Election 2022 ) घेतली. कठोर परिश्रम घेतले, त्याचा फायदा झाला. मुळात ही निवडणूक खूप अवघड, मोठी आणि खूप कठीण होती. अशा स्थितीत आम्ही जिंकून आलो, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा माझ्या नावाची घोषणा केली. संपूर्ण संख्या व गोळाबेरीज केल्याशिवाय ते नाव जाहीर करणार नाहीत, अशी खात्री झाली होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आमच्याकडे 170 चा संख्या असल्याचा दावा करत होते. त्यामुळे या निवडणुकीकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. आजपर्यंत इतिहासामध्ये कधीही निवडणुकीचा निकाल एवढ्या रात्री उशिरा लागलेला होता. हा निकाल आज भाजपच्या बाजूने लागलेला असून ऐतिहासिक निकाल आहे, असे महाडिक म्हणाले. तसेच संजय पवार विरोधात महाडिक अशी लढाई नसून महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी लढाई होती. भाजपने यात यश संपादन केल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.

लोकसभेचा मला अनुभव आहे. तीन वेळा संसद रत्न पुरस्कार प्रमाणपत्र मिळवला आहे. राज्यसभेत जनतेचे जे काही प्रश्न समस्या अडीअडचणी असतील त्या राज्यसभेमध्ये प्रभावीपणे मांडणं, त्यांच्यासाठी चांगले कायदे बनवण्यासाठी आम्ही सगळे ठिकाणी काम करू, असे आश्वासन महाडिक यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिले.

हेही वाचा : RS Election 2022 : 'सामना बरोबरीत'.. महाविकास आघाडी- भाजपने जिंकल्या राज्यसभेच्या प्रत्येकी तीन जागा, संजय पवारांना पराभवाचा धक्का

Last Updated : Jun 11, 2022, 9:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.