मुंबई - पोलिसांच्या बदल्यांबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली ( Maharashtra Police transfer ) आहे. एसआयडी रश्मी शुक्लांच्या ( Sid Rashmi Shukla ) अहवालावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डीजीपी सुबोध जयस्वाल यांनी पत्र ( Cm Uddhav thackeray Letter Subodh Jaiswal ) पाठवले होते. मात्र, त्या पत्राला सुबोध जयस्वाल यांनी उत्तर दिले नाही, असा खुलासा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अंमलबजावणी संचालनालयाला ( Sitarama Kute On Enforcement Directorate ) दिलेल्या जवाबात केला आहे.
"10 उपआयुक्त पोलिसांच्या बदल्यांमध्ये लॉबिंग सुरु असल्याचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी डीजीपी सुबोध जयस्वाल यांना पत्र पाठवत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पण, त्यावर सुबोध जयस्वाल यांनी कोणातेही उत्तर दिले नाही," असे सीताराम कुंटे यांनी सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पुढे कुंटे म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन मार्च 2021 मध्ये रिपोर्ट फाईल करावा लागला आणि तो विधानसभेत ठेवण्यात आला. याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही," असे म्हणणे योग्य नाही. दरम्यान, कुंटे यांनी दिलेल्या जवाबानुसार अंमलबजावणी संचालनालयाने पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा - Anil Deshmukh On Anil Parab : अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "अनिल परब पोलीस बदलीबाबत..."