ETV Bharat / city

Devendra Fadnavis Pen Drive Bomb : 'पेनड्राइव्ह बॉम्ब' येणार फडणवीसांच्या अंगलट..? व्हिडिओत छेडछाड केल्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार - अनिल गोटेंची पेनड्राइव्ह बॉम्बविरोधात तक्रार

विधानसभेत पेनड्राइव्हद्वारे पुरावे सादर करत कथित 'बॉम्ब' टाकणारे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अडचणीत येण्याची शक्यता ( Devendra Fadnavis Pen Drive Bomb ) आहे. त्या पेनड्राइव्हमधील व्हिडीओत छेडछाड करण्यात आली असून, त्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे ( Anil Gote Complaints Pen Drive Bomb ) यांनी दिली.

अनिल गोटे
अनिल गोटे
author img

By

Published : Mar 15, 2022, 5:07 PM IST

मुंबई - राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी विधानसभेमध्ये पेनड्राईव्ह बॉम्ब ( Devendra Fadnavis Pen Drive Bomb ) टाकला. त्यामध्ये त्यांनी संदर्भ दिलेल्या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आली असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला ( Anil Gote Complaints Pen Drive Bomb ) आहे. या पेनड्राइव्हबाबत छेडछाड केल्याची तक्रार मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली असून, केलेली तक्रार ही गंभीर स्वरूपाची आहे. या प्रकरणात लवकरच चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले असल्याचं अनिल गोटे यांनी विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

फडणवीसांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात जावे

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मागे कशाप्रकारे षडयंत्र रचले जाते. याबाबतचा पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दाखवला आहे. तसेच याबाबतची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र, देवेंद्र फडणीस यांनी सीबीआय नाहीतर इंटरपोलकडून ही चौकशी करून घ्यावी. जमल्यास त्यांनी हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयापर्यंत न्यावे, असा खोचक टोला अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तसेच या प्रकरणात शरद पवार यांचे नाव गोवण्यात आलं आहे. शरद पवार यांची राजकीय कारकिर्द पाहिली तर, देवेंद्र फडणीस यांच्या जवळपास वयाएवढी आहे. मात्र, कोणत्याही प्रकरणात शरद पवार यांचं नाव लावल्यास त्याचं महत्त्व वाढतं म्हणूनच त्यांचं नाव या प्रकरणात गोवण्यात आले असल्याची शंका अनिल गोटे यांनी व्यक्त केली.

प्रवीण चव्हाणांना भेटलोच नाही

तसेच या प्रकरणात देवेंद्र फडणीस यांनी पुरावे कुठून आणले याबाबत तपास यंत्रणांना सांगावच लागेल. विरोधीपक्षनेते म्हणून त्यांच्याकडे कोणताही विशेषाधिकार नाहीत. यासोबतच या व्हिडिओची फॉरेन्सिक टेस्ट केली असल्याचं देवेंद्र फडणीस सांगत असले तरी, त्यांची फॉरेन्सिक टेस्ट कशी असते हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे, असा टोला ही अनिल गोटे यांनी यावेळी लगावला. तसेच हे सर्व प्रकरण ज्या सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या आसपास फिरतंय त्या प्रवीण चव्हाण यांना आपण कधी भेटलो नाही, असे अनिल गोटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.