ETV Bharat / city

CM Eknath Shinde : देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना हाताला धरुन बसविले खुर्चीवर, पाहा Video - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी आज पदभार स्वीकारला. त्यावेळी कुटुंबीय, आमदार आणि शिंदे गटाच्या समर्थकांचा गराडा होता. बराच वेळ खुर्चीत बसण्याची प्रतिक्षा करीत होते. बाजूला सरकारचे निर्माते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) असताना, मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या खुर्चीत कसे बसायचे, अशी अस्वस्थता शिंदे यांच्या हालचालीवरुन दिसून येत होती. ती अस्वस्थता, फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी हाताला धरुन शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसविले.

CM Eknath Shinde
फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना हाताला धरुन बसविले खुर्चीवर
author img

By

Published : Jul 7, 2022, 10:50 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याची चर्चा समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात झळकत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी खुर्चीवर बसण्यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेची बराच वेळ वाट पहात होते. अखेर फडणवीस यांनी त्यांना हाताला धरुन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसविले. ही बाब सर्वांच्या लक्षात येताच, उपमुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री कृती करीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना हाताला धरुन बसविले खुर्चीवर

मुख्यमंत्री शिंदे चर्चेत - महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत शिवसेना विरोधात एकनाथ शिंदे आणि बंड पुकारला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन यामुळे पायउतार व्हावे लागले. भाजपने सरकार अस्थिर झाल्याचे सांगत शिंदे गटासोबत राज्यात सत्तेवर आले. शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाली. विधानसभेत शिंदेंच्या नावाची घोषणा झाल्यापासून त्यांनी केलेले भाषण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर केलेल्या कृतीने ते चांगलेच प्रकाश झोतात आले आहेत.

हेही वाचा - CM Eknath Shinde Takes Charge : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रालयात पदभार स्वीकारला

फडणवीस यांनी बसविले खुर्चीवर- मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला. त्यावेळी कुटुंबीय, आमदार आणि शिंदे गटाच्या समर्थकांचा गराडा होता. बराच वेळ खुर्चीत बसण्याची प्रतिक्षा करीत होते. बाजूला सरकारचे निर्माते उपमुख्यमंत्री फडणवीस असताना, मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या खुर्चीत कसे बसायचे, अशी अस्वस्थता शिंदे यांच्या हालचालीवरुन दिसून येत होती. ती अस्वस्थता, फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी हाताला धरुन शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसविले. टेबलावरील काही महत्वाची कागदपत्रे शिंदे यांच्या स्वाक्षरीसाठी फडणवीस यांनी सुपुर्द केले. त्यावर ही माध्यमांमधून चर्चा सुरु होती.

हेही वाचा - Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार दोन टप्प्यात; 'या' तारखेची प्रतिक्षा

टीकेचे धनी बनले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांसमोर नेहमीच गोंधळत असल्याचे दिसतात. ३ जुलै रोजी सरकारचा बहुमताचा ठराव मंजूर झाला. मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाषणाला सुरुवात केली. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीसांना मध्येच थांबवत, सभागृहाला नमस्कार करण्याची परवानगी मागितली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिल्याचे दिसून आले. विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंवर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी शिंदे त्यांच्या समोरील माईक ओढून घेत, फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यानंतर सोशल मीडियातून शिंदेची जोरदार खिल्ली उडवण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर शिंदे काम करणार असल्याचे मिम्स व्हायरल झाले. आजच्या नव्या प्रकरणाची भर पडल्याने मुख्यमंत्री शिंदे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दरबारी जाणार ( CM Eknath Shinde Visit Delhi ) आहेत. उद्या ( शुक्रवार ) सायंकाळी ते दिल्लीला जाणार आहेत. शनिवारी ( 9 जुलै ) ते दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ), गृहमंत्री अमित शाह ( HM Amit Shah ), भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची ते भेट घेणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत.

हेही वाचा - CM Eknath Shinde : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर; पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांची घेणार भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.