मुंबई - विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर मुंबईत ड्रग्जचा खेळ सुरु होता, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आज पत्रकार परिषदेत केला होता. मलिकांच्या या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आला म्हणून ड्रग्ज माफिया झालो असेल, तर ज्यांच्या घरात गांजा सापडल आहे. तर संपूर्ण राष्ट्रवादी ड्रग्ज पार्टी म्हटली गेली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तसेच दिवाळीनंतर मी नवाब मलिकांचे अंडरर्ल्डशी कसे संबंध आहेत, याचे पुरावे मी शरद पवार आणि जनतेला देईल, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस -
नवाब मलिकांनी दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका लावत बॉम्ब फोडल्याचा आव आणला आहे. मात्र, मलिकांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. आपल्या जावयाची चार्जशीट कमकुवत व्हावी आणि एनसीबीने दबावात येऊन आपल्या जावयाला सोडावे यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत, असे फडणवीसांनी म्हटले.
तसेच मंत्री नवाब मलिक यांनी लावलेले आरोप हास्यास्पद आहे. रिव्हर मार्च या संघटनेने रिव्हर अँथम तयार केले होते. या टीममधील व्यक्तींनी आमच्यासोबत फोटो घेतले होते. चार वर्षांपूर्वीचे हे फोटो होते. त्यावरुन मलिक यांनी आम्हाला माफिया ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या पत्नीसोबतचा फोटो जाणीवपूर्वक ट्विट केला आहे. कारण त्याचे महत्त्व वाढते. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत काय संबंध आहेत. त्याचे पुरावे हे तपास यंत्रणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देणार आहे, असेही ते म्हणाले.
निरज गुंडे यांच्या संबंधीच्या आरोपांना ते स्वतः उत्तर देतील. निरज गुंडे हे आमच्याशी संबंधीत आहेत, हे नाकारत नाही. मात्र, माझ्यापेक्षा आधीपासून निरज गुंडेंचे संबंध हे उद्धव ठाकरे यांच्याशी आहेत. निरज गुंडे यांच्याशी शिवसनेचे संबंध अधिक आहे. आम्हाला वाझे पाळण्याची सवय नाही, असे स्पष्टीकरणही फडणवीसांनी दिले.
हेही वाचा - महाराष्ट्रात फडणवीसांच्या इशाऱ्यावरच ड्रग्जचा धंदा; नवाब मलिकांचा गंभीर आरोप