ETV Bharat / city

शिवसेना म्हणजे नौटंकी सेना - देवेंद्र फडणवीस - Fadnavis criticizes Shiv Sena

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी शिवसेनेला नौटंकी सेना, नाटक कंपनी म्हटले आहे.

devendra-fadnavis-has-criticized-shiv-sena
शिवसेना म्हणजे नौटंकी सेना,नाटक कंपनी - देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jan 5, 2021, 7:17 PM IST

Updated : Jan 5, 2021, 7:40 PM IST

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गुजराती मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी गुजराती प्रचार करत मेळावा भरवणार असल्याचे सांगत आहे. यावर किमान निवडणुकीच्या दृष्टीने तरी शिवसेनेला गुजराती लोकांची आठवण आली हे चांगले आहे, शिवसेना म्हणजे नौटंकी सेना, नाटक कंपनी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शिवसेना म्हणजे नौटंकी सेना - देवेंद्र फडणवीस

शिवसेना काय करेल सांगता येत नाही -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेना काय करेल सांगता येत नाही. बाळासाहेबांना जनाब केले, अजाण स्पर्धा भरवतील आणि काय काय करतील. किमान निवडणुकीच्या दृष्टीने तरी शिवसेनेला गुजराती लोकांची आठवण आली चांगलं आहे, शिवसेना म्हणजे नौटंकी सेना, नाटक कंपनी असे ते म्हणाले. वर्षानुवर्ष निवडणुका आल्या की यांना वेगवेगळ्या गोष्टी आठवतात. मात्र, निवडणुकांआधी त्या यांना आठवत नाहीत

शिवसेना आणि काँग्रेस ठरवून करत आहे -

औरंगाबादचा नामांतरण करण्या विषयी राजकारण शिवसेना आणि काँग्रेस ठरवून करत आहे. निवडणुकीच्या दृष्टीने हे सर्व चाललेला आहे. ते गांभीर्याने सरकार चालवत नाही आहेत. आज इतके वर्ष सत्तेत असूनही काही करता आलेले नाही, हे नुसते पत्र पाठवतात असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

राऊत सोडून द्याना ते बोलण्याच्या लायक नाहीत -

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडी चौकशीसाठी बोलावल्यानंतर संजय राऊत यांनी हे सर्व भाजपाचे राजकारण आहे, असे म्हटले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटले की, संजय राऊत रोज काय काय बोलत असतात, किती लिहीत असतात. आम्ही त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायच्या सोडून द्याना ते बोलण्याच्या लायक नाहीत.

लसीकरण -

राष्ट्रीय प्रोटोकॉल ठरला आहे, त्याप्रमाणे काम करायचे आहे. गरिबाला मोफत लस द्यायला पाहिजे असे आमचे म्हणणे आहे.

मेहबूब शेख -

राज्यातले पोलीस असे वागतात हे बघून आश्चर्य वाटत आहे. आरोपीचे नाव घेण्याचीसुद्धा पोलिसांना लाज वाटत आहे असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.

गिरीश महाजन प्रकरण -

ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. ते जुने 3 वर्षापूर्वीचे प्रकरण आहे. गिरीश महाजन याबाबत उच्च न्यायालयात गेले होते असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.

Last Updated : Jan 5, 2021, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.