ETV Bharat / city

राम मंदिरासाठी वर्गणीवरून ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांच्या घरी माणसं पाठवू, फडणवीसांचा शिवसेनेला टोला

author img

By

Published : Dec 22, 2020, 8:14 PM IST

Updated : Dec 22, 2020, 9:07 PM IST

राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्याच्या निर्णयानंतर ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांनी जाहीर केलेला निधी ट्रस्टला द्यावा. नाही तर आमचे कार्यकर्ते तुमच्या घरी येऊन वर्गणी घेतील. त्याची पावतीही तुम्हाला रितसर दिली जाईल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.

Devendra Fadnavis criticizes Shiv Sena
देेंद्र फडणवीस

मुंबई - राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्याच्या निर्णयानंतर ज्यांच्या पोटात दुखतंय त्यांनी जाहीर केलेला निधी ट्रस्टला द्यावा. नाही तर आमचे कार्यकर्ते तुमच्या घरी येऊन वर्गणी घेतील. त्याची पावतीही तुम्हाला रितसर दिली जाईल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. वर्गणी गोळा करण्याच्या भूमिकेबाबत सामनातून भाजपला लक्ष करण्यात आले होते. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. भाजप नेते माधव भंडारी यांच्या अयोध्या या पुस्तकाचे प्रकाशन आज (मंगळवार) झाले त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेला टोला -

राम मंदिर हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे आहे. त्यावर प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. त्यामुळे जे वर्गणी गोळा करण्यावर आक्षेप घेत आहेत त्यांना ही बाब सांगण्याची वेळ आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. जे विरोध करत आहेत त्यांना ही सांगतो, की २०२४ ला राम मंदिर तयार होईल तेव्हा तुम्ही दर्शनासाठी या, असा टोलाही अप्रत्यक्षपणे फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाषण करताना

आमचे कार्यकर्ते तुम्हाला पावती देतील -

ज्यांनी राममंदिरांसाठी निधीची घोषणा केली आहे. त्यांनी ट्रस्टकडे निधी जमा करावा. ते जमत नसेल तर आमचे कार्यकर्ते आम्ही तुमच्या घरी पाठवू. त्यांच्याकडे निधी द्या. त्याची रितसर पावतीही तुम्हाला दिली जाईल, असेही फडणवीस म्हणाले. त्यांचा बोलण्याचा रोख हा शिवसेनेकडे होता. उद्धव ठाकरे यांनी आयोध्येत जाऊन राम मंदिरासाठी निधीची घोषणा केली होती त्या पार्श्वभूमिवर ते बोलत होते.

सोमनाथ मंदिराला नेहरूंचा विरोध -

यावेळी बोलताना त्यांनी सोमनाथ मंदिराच्या निर्माणाचा इतिहास ही सांगितला. हे मंदिर बांधण्याला पंडित नेहरूंचा विरोध होता असे ते म्हणाले. मात्र वल्लभभाई पटेल यांच्या ठाम भूमिकेमुळे हे मंदिर बांधता आले. शिवाय या मंदिराच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी जाऊ नये, असेही पंडितजींना वाटत होते असे फडणवीसांनी यावेळी आवर्जून सांगितले.

राम मंदिर आंदोलनातील प्रत्येक जण कारसेवक -

राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेला प्रत्येक जण हा कोणत्याही पक्षाचा म्हणून सहभागी नव्हता तर तो श्रद्धेने त्यात सहभागी झाला होता, असा चिमटा ही त्यांनी यानिमित्ताने शिवसेनेला काढला. प्रत्येक जण हा पक्षाचा कार्यकर्ता नव्हे तर कारसेवक म्हणून स्वंयस्फुर्तीने या आंदोलनात होता, असा दावाही त्यांनी केला.

काय केली होती शिवसेनेने टीका -

'चार लाख स्वयंसेवक गावागावात जाऊन वर्गणी गोळा करणार हे लोकांना मान्य नाही. हे चार लाख लोक कोणाच्या प्रचारासाठी पाठवत आहेत?, असा सवाल संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला होता. तसंच, राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला हवा. राम मंदिराचं राजकारण केव्हा तरी संपवावं,' अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. 'रामाच्या नावानं बँकेत खातं उघडलं आहे त्यात पुरेसा निधी येतो. शिवसेनेने मंदिर निर्माणासाठी एक कोटीचा निधी सगळ्यात आधी दिला आहे, असं नमूद करतानाच राजकीय प्रचारासाठी असं करणं हा हजारो कारसेवकांचा अपमान आहे,' अशी टीकाही केली होती. 'अयोध्येचा राजा प्रभू श्री राम यांच्या मंदिरासाठी लोकांनी बलिदान दिलंय व न्यायालयाच्या आदेशानं मंदिर निर्माण होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालंय. तरीही अयोध्याच्या राजासाठी वर्गणी गोळा करायला घरोघरी जाणार हा अयोध्येच्या राजाचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे,' अशी टीका राऊत यांनी केली होती.

Last Updated : Dec 22, 2020, 9:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.