ETV Bharat / city

रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि गरीबांचे मृत्यू थांबवा! - देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून, त्यामुळे गरीबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अनेकांनी तर याचा गोरखधंदा सुरू केला आहे. एकीकडे गरीब रुग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरचा काळाबाजार ही स्थिती अतिशय गंभीर आहे. यात तातडीने हस्तक्षेप करीत गरीब रुग्णांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Oct 3, 2020, 3:49 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत आहेत. यात तातडीने हस्तक्षेप करीत गरीब रुग्णांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात दर दिवशी सरासरी सुमारे 20 हजार कोरोना रुग्णांची भर पडत आहे. दररोज सरासरी 450ने बळीसंख्या वाढत आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्त्वाचे औषध आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा सुरळीत राहील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले तरी रुग्णालयांकडून मात्र टंचाईचेच कारण सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णालयांकडून रुग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जात आहे. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. त्यामुळे त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे.

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबविली. परंतु ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यांतून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला, असे वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. रेमडेसिवीर अभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. खरेदी योग्य झाली नसल्याने याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. परिणामी, प्रचंड तुटवडा निर्माण झाला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून, त्यामुळे गरीबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अनेकांनी तर याचा गोरखधंदा सुरू केला आहे. एकीकडे गरिब रुग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरचा काळाबाजार ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सर्व गरीब रुग्णांना सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, असे या पत्रात नमूद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.