ETV Bharat / city

लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहचवण्याची कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजअंतर्गत देण्यात येणारी मदत संबंधित घटकांपर्यंत तात्काळ पोहचवण्यासाठी, उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. युध्दपातळीवर त्यासाठी कार्यवाहीची अंमलबजावणी सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By

Published : Apr 19, 2021, 7:04 PM IST

मुंबई - कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात सुमारे सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगार, घरेलु राज्यातील फेरीवाले, रिक्शाचालक यांच्यासह विविध समाजघटकांसाठी जाहीर केलेल्या मदतीचा निधी तात्काळ वितरित करावा. युध्दपातळीवर त्यासाठी कार्यवाहीची अंमलबजावणी सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले.

प्रतिबंधक उपाययोजना व उपचारांसाठीच खर्च करा

जिल्हा वार्षिक योजनेतील तीस टक्के निधी आरोग्य सुविधांवर खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याअंतर्गत 3 हजार 330 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 1 हजार 100 कोटी रुपयांच्या निधीचे वितरणही झाले आहे. पहिल्या टप्प्यातील निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व उपचारांसाठीच खर्च करण्यात यावा. उर्वरीत निधीही गरजेनुसार तातडीने वितरीत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे.

अशी मिळणार लाभार्थ्यांना आर्थिक मदत

राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने 5 हजार 476 कोटी रुपये मदतीच्या पॅकेजची घोषणा केली. याअंतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे, यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. निर्बंधकाळात राज्यभर दररोज दोन लाख शिवभोजन थाळ्या मोफत देण्यात येणार आहेत. यासाठी 75 कोटी रुपये उपलब्ध केले जातील. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन या पाच योजनांतील राज्यभरातील 35 लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरीता प्रत्येकी 1 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी 961 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्यातील 12 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजारांप्रमाणे 180 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. राज्यातील 25 लाख नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी 375 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यातील 5 लाख नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 75 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 180 कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे. ही मदत देतांना सायकल रिक्षाचालकांचाही विचार करण्यात आला आहे. आदिवासी विभागांतर्गत खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या 12 लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे 240 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.

आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करा

निर्बंधाच्या काळात राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील एकाही नागरीकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत युध्दपातळीवर काम करावे. उर्वरीत शासन निर्णय जारी करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. योग्य व गरजू लाभार्थ्यांपर्यंत मदत पोचविण्याची चोख व्यवस्था व्हावी. यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. या बैठकीला छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, अनिल परब, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - चंद्रपूर : बेड न मिळाल्याने कोरोना रुग्णाने कारमध्येच घेतला अखेरचा श्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.