मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. अजित पवार यांनी राज्यातील कोरोना बिघडल्याने तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री उपस्थित असणार आहेत.
व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ही बैठक घेण्यात येणार आहे. राज्यातील ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आदि परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. आज सायंकाळच्या सुमारास ही बैठक होणार आहे.
हे ही वाचा - अंध आईच्या हातून निसटला मुलगा, पडला रेल्वे ट्रॅकवर, पॉइंटमनने वाचवला जीव
महाराष्ट्रात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. राज्य सरकारने आता बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवालाची आवश्यकता असेल. राज्य सरकारने रविवारी हे आदेश जारी केले.
हे ही वाचा - 'देशाला गरज असताना भाजपा नेते रेमडेसिवीरची साठेबाजी करतायत'; काँग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. रविवारी पुन्हा एकदा राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल 68 हजार 631 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.