ETV Bharat / city

आर्यन खान प्रकरणातील 'त्या' पंचची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी - 'त्या' पंचची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

माझे नाव उघड केल्यामुळे जीवाला धोका आहे, मला सुरक्षा देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र क्रूझ प्रकरणातील एका साक्षीदाराने भोईवाडा पोलिसांना पाठवले आहे. दरम्यान या साक्षीदाराने रविवारी भोईवाडा पोलीस ठाण्याला एक पत्र पाठविले. मी गुन्ह्यातील साक्षीदार असून नवाब मलिक यांनी माझे नाव उघड करून माझे छायाचित्रे प्रसिद्ध केल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून मुंबई पोलिसांनी मला सुरक्षा द्यावी, असे पत्रात म्हटले आहे.

भोईवाडा पोलीस
भोईवाडा पोलीस
author img

By

Published : Oct 19, 2021, 8:25 PM IST

मुंबई - मुंबईतील क्रुज ड्रग्स प्रकरणातील साक्षीदाराचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर करत एसीबीवर हल्ला बोल केला होता. आता त्या साक्षीदाराने भोईवाडा पोलीस स्टेशनला पत्र लिहून माझ्या जीवाला धोका असल्यामुळे सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

नवाब मलिकांचा पंच संदर्भात NCB ला प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात एनसीबीच्या कामावर संशय व्यक्त करून काही साक्षीदारांची नावे उघड करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. एनसीबीच्या कारवाईत या खासगी लोकांचे काय काम होते. हे खासगी लोक आरोपींना कसे काय हाताळू शकतात? असा सवाल केला होता. यावर एनसीबीचे अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे लोक क्रूझ प्रकरणातील गुन्ह्यातील साक्षीदार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मलिक यांनी आणखी एका व्यक्तीचे फोटो व्हायरल करून हे व्यक्ती एनसीबीच्या तीन गुन्ह्यात पंच कसे राहू शकतात? असाही सवाल उपस्थित करुन साक्षीदारांचे नाव उघड केले होते.

पत्रात काय म्हटले?

माझे नाव उघड केल्यामुळे जीवाला धोका आहे, मला सुरक्षा देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र क्रूझ प्रकरणातील एका साक्षीदाराने भोईवाडा पोलिसांना पाठवले आहे. दरम्यान या साक्षीदाराने रविवारी भोईवाडा पोलीस ठाण्याला एक पत्र पाठविले. मी गुन्ह्यातील साक्षीदार असून नवाब मलिक यांनी माझे नाव उघड करून माझे छायाचित्रे प्रसिद्ध केल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून मुंबई पोलिसांनी मला सुरक्षा द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. याबाबत पत्र आले असून याबाबत चौकशी सुरु असल्याचे भोईवाडा पोलीस स्टेशनमधील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांचा अभिनेत्री शर्लिन चोप्रा विरुद्ध 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.