ETV Bharat / city

Deepali Syed Statement : वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद - CM Eknath Shinde

जय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शांततेचा पवित्रा घेऊन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Party chief Uddhav Thackeray ) आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद ( Actress Deepali Syed ) यांनी पत्रकार परिषदेत केली. पुढील 2 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येऊन चर्चा करतील, असा दावा शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केला होता. अनेक तर्कवितर्क यावरुन लढवले जात होते.

दिपाली सय्यद
दिपाली सय्यद
author img

By

Published : Jul 17, 2022, 12:00 PM IST

Updated : Jul 17, 2022, 1:11 PM IST

मुंबई - शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांनी बंडखोरांचा चांगलाच समाचार घेत आहेत. शिंदे गटाकडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शांततेचा पवित्रा घेऊन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Party chief Uddhav Thackeray ) आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद ( Actress Deepali Syed ) यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच संजय राऊत यांच्या परखड मतांचे यावेळी समर्थनही सय्यद यांनी केले आहे.

ट्विटद्वारे मांडली भूमिका - पुढील 2 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) एकत्र येऊन चर्चा करतील, असा दावा शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केला होता. अनेक तर्कवितर्क यावरुन लढवले जात होते. दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मी भेटले. त्यांच्या बोलण्यातून दोघेही सकारात्मक जाणवले. हेच ट्विटद्वारे मी मांडले. दोन्ही बाजूच्या आमदारांचीही तीच भावना आहे, असे दिपाली सय्यद यांनी सांगितले आहे.

संजय राऊतमुळे शिवसेनेवर संकट ओढवल्याची चर्चा - शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर हे संकट ओढवल्याची चर्चा आहे. दिपाली सय्यद यांनी यावरुन राऊतांची पाठराखण केली आहे. राऊत आक्रमक आणि परखड बोलतात. पक्षाची भूमिका मांडतात. ते बिनधास्त आहेत. त्यांची भाषाशैली तशीच आहे. शिवसेनेला पाठिंबा देणे, ही भावना त्यांच्या बोलण्यातून वेळोवेळी दिसून येते. संजय राऊत त्याचे काम करत आहेत. भाजपलाही त्याच पद्धतीने बोलतात. परंतु, राऊतांनीही थोडी शांतता घ्यावी आणि ठाकरे आणि शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे यावेळी सय्यद म्हणाल्या.

शिवसैनिक एकत्र येत असतील, तर सर्वांनाच आनंद - शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सर्वसामान्य शिवसैनिक व्यथीत झाला आहे. अनेकांनी शिंदे यांच्या भूमिकेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दोघांनी एकत्र यावे, असे अनेकांना वाटते. मी सुध्दा साधी शिवसैनिक आहे. आमचे शिवसैनिक एकत्र येत असतील, तर सर्वांनाच आनंद आहे. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानालया कमी पडणार नाही. मग भाजप असो, शिंदे असो किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो सर्वांचे आभार मानेन, असे दिपाली सय्यद यांनी सांगितले. तसेच दोन्ही बाजूच्या नेत्यांना भेटल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून मान अपमानचा मुद्दा कळीचा ठरत असल्याचे जाणवले. तो दूर झाल्यास सर्व गोष्टी चांगल्या होतील, असे सय्यद यांनी स्पष्ट केले आहे.

दिगंबर नाईक शिंदे गटात - दिगंबर नाईक शिंदे गटात सामिल झाले आहेत. सुरुवातीपासूनच ते शिंदे यांच्या गटात होते. मलाही शिंदे यांनी शिवसेनेत आणले. त्यांच्यामुळे मी पक्षात काम करत आहे. परंतु, माझे नेते उद्धव ठाकरे आहेत, असा खुलासा सय्यद यांनी केला. प्रत्येक पक्ष आपला विचार करतो. मग, शिवसेनेने नैसर्गिक युती केली असेल, ती चांगल्यासाठी झाली असेल, तर वाईट काय. मात्र, शिंदेंची घरवापसी व्हावी. एकाच घराचे दोन तुकडे झालेले चांगले नाही. लवकरच दोन्ही नेते एकत्र भेटतील, असा विश्वास सय्यद यांनी व्यक्त केला. तसेच प्रत्येकाने शांततेने प्रयत्न केले तर त्यातून नक्कीच मार्ग निघेल, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा - All Party Meet : संसदेचे जास्तीत जास्त कामकाज करण्यावर होणार सर्वपक्षीय बैठकीत खल

Last Updated : Jul 17, 2022, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.