ETV Bharat / city

परमबीर सिंह यांना फरार घोषित करा; मुंबई पोलिसांच्या अर्जावर आज निर्णय

परमबीर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईमध्ये पाच वेगवेगळे खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांचा तपास मुंबई गुन्हे शाखेचं पथक करत आहे. गुन्हे शाखेच्या तपासानुसार परमबीर सिंह हे फरार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला आहे.

परमबीर सिंह
परमबीर सिंह
author img

By

Published : Nov 16, 2021, 1:43 PM IST

Updated : Nov 16, 2021, 1:53 PM IST

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना अनेकदा समन्स बजावून पण चौकशीला उपस्थित न राहिल्याने परमबीर सिंह यांना फरार घोषित (Declared absconding) करा असा अर्ज 13 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केला आहे. यावर आज मंगळवारी मुख्य दंडाधिकारी न्यायालय निर्णय देणार आहे.

परमबीर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईमध्ये पाच वेगवेगळे खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांचा तपास मुंबई गुन्हे शाखेचं पथक (Mumbai Crime Branch Squad) करत आहे. गुन्हे शाखेच्या तपासानुसार परमबीर सिंह हे फरार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला आहे. या व्यतिरिक्त रियाझ भाटी (Riyaj Bhati) आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

आरोप काय?

गोरेगावमधील विमल अग्रवाल (Vimal Agrawal) नावाच्या व्यापाऱ्याने सचिन वाझे, परमबीर सिंग, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह आणि रियाज पटेल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. माझं पार्टनरशिपमध्ये गोरेगाव (Goregaon) इथे BOHO रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये BCB स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे (Sachin Waze) आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी- फेब्रुवारी 2020 पासून ते मार्च 2021 या काळात 9 लाखांची वसूली केली आहे, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला होता. अग्रवाल यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार 384, 385, 388, 389, 120 ब आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Nov 16, 2021, 1:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.