ETV Bharat / city

लसीकरणादरम्यान वृद्धाचा मृत्यू, महापालिकेकडून समिती गठीत 

मुंबईत लसीकरणादरम्यान एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या मृत्यूची गंभीर दखल मुंबई महापालिकेने घेतली आहे. या प्रकरणी महापालिकेने चिकित्सा करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकिय समिती स्थापन केली आली आहे.

Death of an old man during vaccination
लसीकरणादरम्यान वृद्धाचा मृत्यू
author img

By

Published : Mar 9, 2021, 9:17 PM IST

मुंबई - मुंबईत लसीकरणादरम्यान एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या मृत्यूची गंभीर दखल मुंबई महापालिकेने घेतली आहे. या प्रकरणी महापालिकेने चिकित्सा करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकिय समिती स्थापन केली आली आहे. समितीची त्वरित बैठक आयोजित करण्यात येणार असून ही समिती मृत्यू बाबतची कारणे शोधणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

लसीकरणानंतर वृद्धाचा मृत्यू -
काल (सोमवारी ८ मार्च) मुबंई महानगरपालिका क्षेत्रातील एका खासगी रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात 'कोविड-१९' लसीकरण सुरु असताना ६८ वर्षीय एका ज्येष्ठ व्यक्तीस दुपारी ३.३१ च्या सुमारास लस देण्यात आली. लस दिल्यानंतर ती व्यक्ती बेशुध्द झाली. यामुळे त्यांना तातडीने आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक औषधोपचार करुन त्वरीत त्याच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. परंतु सायंकाळी ५.०५ वाजता त्या वृद्ध व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले. या संबंधीची माहिती पोलिसांना कळविण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालय येथे पाठविण्यात आला. ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर या व्यक्तीचा मृत्यू का झाला हे समोर येणार आहे. तसेच अधिक चौकशीसाठी त्याचा व्हिसेराही घेण्यात आला आहे. त्याचीही तपासणी केली जाणार आहे. दरम्यान या प्रकरणी चिकित्सा (Causality assessment) करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकिय समिती स्थापन करण्यात आली असून समितीची त्वरित बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ही समिती मृत्यू बाबतची कारणमिमांसा करणार आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

आतापर्यंतचे लसीकरण -
केंद्र शासनाच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ३३ सार्वजनिक रुग्णालये व ३८ खाजगी रुग्णालय अशा एकूण ७१ रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रात 'कोविड-१९' लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेदरम्यान ८ मार्चपर्यंत १,६२,५९८ आरोग्य कर्मचारी, १,११,०७८ कोविड आघाडीवर काम करणारे कर्मचारी, ६० वर्षे व अधिक वयाच्या १,०५,८६७ व्यक्ती व ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेले ११,३९५ असे एकूण ३,९०,९३८ लाभार्थ्याना कोविड लस देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे लसीकरणानंतर सौम्य प्रकारची लक्षणे लाभार्थ्यांमध्ये येतात. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणे, हलकासा ताप, अशक्तपणा, चक्कर येणे असे सौम्य दुष्परिणाम दिसून येतात. आतापर्यंत १६ लाभार्थ्यांना एक किंवा दोन दिवसासाठी रूग्णालयात देखरेखीसाठी दाखल करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.