ETV Bharat / city

Devendra Fadnavis : 'राजकारणात गिफ्ट नाही, सरप्राईज गिफ्ट असतं, मेटेंनाही मिळेल'

author img

By

Published : Jul 16, 2022, 5:11 PM IST

विनायक मेटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विनायक मेटे यांचा सन्मान करावा, अशी मागणी केली. तर, राजकारणातले गिफ्ट हे कधी घोषित केले जात नाही, तर ते सरप्राईज गिफ्ट असते, असे देवेंद्र फडणवीस यांनी ( Devendra Fadnavis On Vinayak Mete ) म्हटलं.

devendra fadnavis vinayak mete
devendra fadnavis vinayak mete

मुंबई - राजकारणातले गिफ्ट हे कधी घोषित केले जात नाही, तर ते सरप्राईज गिफ्ट असते. विनायक मेटे यांना सरप्राईज गिफ्ट दिले जाईल. मलाही सरप्राईज गिफ्ट दिलं गेलं, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष विनायाक मेटे यांना आश्वासन दिलं ( Devendra Fadnavis On Vinayak Mete )आहे.

विनायक मेटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शेकडो शिवसंग्राम चे कार्यकर्त्यांसहित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर, आमदार भारती लव्हेकर व इतर नेते उपस्थित होते. तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विनायक मेटे यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणातले गिफ्ट हे कधी घोषित केले जात नाही, तर ते सरप्राईज गिफ्ट असते. मेटे यांना सरप्राईज गिफ्ट दिले जाईल. मेटे यांच्यामध्ये नेतृत्वाचे बीज लहानपणापासूनच आहे, जो प्रवास त्यांनी केला आहे, तो एकट्याच्या हिमतीवर केला आहे. त्यांनी अनेक संघर्ष केले, त्याचबरोबर मराठा आरक्षणावर त्यांनी केलेली काम सुद्धा फार मोठी आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'सर्व घटक पक्षांचा यथोचित सन्मान केला जाईल' - मागील २० वर्षापासून मी विनायक मेटे यांना बघत आहे. परंतु, त्यांचं वय वाढताना दिसत नाही. ते तेव्हा जसे होते तसेच आजही आहेत. त्यांच्यात प्रचंड कार्य करण्याची ऊर्जा आहे. आज आपल्या नवीन सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास मान्यता दिल्याने हा एक मोठा निर्णय विशेष करून मराठा समाजाच्या हिताचाही घेतलेला आहे. काही लोकांना असं वाटतं की याला जाती-धर्माचा अँगल आहे. मात्र, आक्रमणाच्या पाऊलखुणा पुसण्याचे काम जगातील प्रत्येक देश करतो. ज्यांनी या देशावर आक्रमण करून देश संपवण्याचा प्रयत्न केला, अशा गुलामीच्या पाऊलखुणा आम्ही संपवत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला संपूर्ण देशाचा विचार करायला शिकवले आहे. हे सरकार सर्वांचं आहे. हे सरकार स्थापन करत असताना जरी हे शिवसेना भाजपचे असले तरी शिवसंग्राम पासून आमच्या सोबत जे घटक पक्ष आहेत. त्या सर्वांचा सन्मान या सरकारमध्ये केला जाईल, असेही आवर्जून देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलं.

'ओबीसींचे आरक्षण ही लवकर मिळवून देणार'- मराठा आरक्षणावर आम्ही चांगली लढाई उच्च न्यायालयात लढलो. आम्हाला न्याय भेटला. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा पाच मिनिटांमध्ये निर्णय आमच्या बाजूने दिला. पण, सरकार बदलल्यावर जे काही झालं ते सर्वांना माहीत आहे. आज हा एक अवघड रस्ता झाला आहे. मात्र, त्या रस्त्याने आपल्याला जावेच लागेल. आम्ही सारथी तयार केली ती सुद्धा मागच्या सरकारने ठप्प केली. सर्व सुविधाच्या सरकारच्या हातात होत्या, त्याही त्यांनी केल्या नाहीत. मागच्या मुख्यमंत्र्यांनी कोणाला भेट दिली नाही. आमचे सरकार ओबीसीचे आरक्षण, पण लवकर मिळून देईल. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत सुविधा पोहोचल्या पाहिजेत ही आमची इच्छा आहे, असे देवेंद्र फडवणीस यांनी स्पष्ट केलं.

'मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसच' - याप्रसंगी बोलताना विनायक मेटे म्हणाले की, माझा पायगुण चांगला आहे, कारण माझ्या जन्मदिनीच ३० जूनला एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस यांनी शपथ घेतली. मागच्या सरकारने एकाही समाजाला न्याय दिला नाही. सर्व समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचं, भ्रष्टाचार करण्याचं काम मागच्या सरकारने केलं आहे. मागच्या अडीच वर्षात सर्व प्रस्थापित नेते मंत्रिमंडळात होते, आमची लढाई ही विस्थापित लोकांची आहे. आम्हाला न्याय फक्त देवेंद्र फडवणीस देतील. शिंदे मुख्यमंत्री असले तरी आमच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसच आहेत, असं विनायक मेटे यांनी प्रसंगी सांगितलं.

'मागच्या अडीच वर्षांत शिवस्मारकाबाबत एकही बैठक नाही' - एकनाथ शिंदे यांनी रिक्षा चालवली असेल, तर आम्ही सुद्धा भाजी विकली आहे. रंगकाम केलं आहे. पडेल ते काम केलं आहे. ज्यांना जे मिळायला हवे ते त्यांना मिळायलाच हवे. मराठा आरक्षण टिकवण्याचे काम आता आपणाला करावे लागणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना काढली. परंतु, मागच्या अडीच वर्षात अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत अनेकदा मी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलो. मात्र, त्यांनी एकही बैठक घेतली नाही, ही शरमेची बाब असल्याचही विनायक मेटे यांनी म्हटलं.

हेही वाचा - Devendra Fadnavis : 'सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडल्याने...'; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.