मुंबई: टाटा ग्रुपचे माजी चेअरमन उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रवीवारी अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अपघातामुळे उद्योगविश्वाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई अहमादाबाद महामार्गावरील सुर्या नदीच्या पुलावर त्यांचा अपघात झाला. सायरस मिस्त्री यांच्य सह दोन लोक दगावल्याची माहिती समोर आली असून मर्सिडीज गाडी डिव्हायडरला धडकल्याने सदर अपघात झाला असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले होते. मात्र ओव्हरस्पीड तसेच सिटबेल्ट न घातल्यामुळे या अपघातात सायरस यांच्या डोक्याला मोठा मार लागला त्यात त्यांचा मल्टीट्रॉमा मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दोघांचा मृत्यू दोन जखमी सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. गुजरातमधील उडवाडा येथे बांधलेल्या पारशी मंदिरातून ते परतत होते. महाराष्ट्रातील पालघरजवळ 54 वर्षीय मिस्त्री यांची मर्सिडीज रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातात मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे हे दोघे जागीच ठार झाले, तर कार चालवत असलेल्या महिला डॉक्टर अनायता पांडोळे आणि त्यांचे पती दारियस पांडोळे हे जखमी झाले.
सुमारे 134 किमी प्रतितासाचा वेग सायरस मिस्त्री येत असलेली लक्झरी मर्सिडीज कार सुमारे 134 किलो मीटर प्रतितास वेगाने चालत होती हे समोर आले आहे. अपघातापुर्वी काही मिनिट आगोदरचे कारचे शेवटचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यावरुन रविवारी दुपारी २ वाजुन २१ मिनीटाला या कारने चारौती चेकपोस्ट ओलांडले. अपघाताचे ठिकाण येथून 20 किमी अंतरावर आहे. मर्सिडीज कारने हे अंतर अवघ्या 9 मिनिटांत पूर्ण केल्याचे समोर आल्यामुळे कारचा वेग जास्त होता हे समोर आले.
सीट बेल्ट घालने टाळले ओव्हरटेकिंगच्या वेळी भरधाव वेग आणि निर्णय चुकल्यामुळे कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातात जीव गमावलेले मिस्त्री आणि जहांगीर हे दोघेही मागे बसले होते त्यांनी सीट बेल्ट घातलेला नव्हता. त्याचवेळी डिव्हायडरला कार धडकल्यानंतर पुढील एअरबॅग्ज उघडल्या, मात्र मागील एअरबॅग सिटबेल्ट घातलेला नसल्यामुळे उघडल्या गेल्या नाहीत. हे एक त्यांच्या मृत्यू मागचे एक कारण सांगीतले जात आहे.
पॉलीट्रॉमामुळे झाला मृत्यू या अपघातात सायरस मिस्त्री यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या अंतर्गत भागात गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला ही बाब पोस्टमॉर्टम अहवालात समोर आली आहे. वैद्यकीय भाषेत याला पॉलीट्रॉमा म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस आणि जहांगीरचे पोस्टमॉर्टम रविवारी रात्री मुंबईतील जेजे रुग्णालयात झाले. त्या नंतर डाॅक्टरांनी त्यांच्या मृत्यू मागचे कारण स्पष्ट केले
कारची तपासणी सध्या अपघातग्रस्त कारची न्यायवैद्यक तपासणी सुरू आहे. त्यातून अपघाताचे खरे कारण कळेल. असे पोलिसांनी सांगितले आहे घटनास्थळी किंवा त्यांच्या कारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. रस्त्याची स्थितीची चांगली होती. त्यामुळे अखेर चूक कुठे झाली याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचेही संकेत दिलेत. गाडी कुणाच्या नावावर आहे, याचाही शोध घेतला जात आहे.
मिस्त्रींचे कुटुंबिय ब्रिटनमध्ये सायरस मिस्त्री यांचा मुलगा व पत्नी फॅमिली फंक्शनसाठी यूकेमध्ये गेलेले आहेत. सोमवारी उशीरा पर्यंत ते मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. रविवारी मिस्त्री यांचे सासरे व ज्येष्ठ वकील इक्बाल छागला तथा त्यांचे मेहुणे न्यायमूर्ती रियाझ छागला पोलिस व पालघर प्रशासनाच्या संपर्कात होते. त्यांचे कुटुंबिय आल्या नंतर म्हणजे मंगळवारी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
उदवाराच्या पारशी मंदिराचा खर्च उचलायचे मिस्त्री उदवारा स्थित पारशी मंदिरात मुंबईकडे येत होते. या मंदिराने दिलेल्या माहिती प्रमाणे, मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण पारशी समाजाला धक्का बसला आहे. वडील पालोनजी यांच्यानंतर सायरसने आमच्या इराणशाह अग्नि मंदिराचा जीर्णोद्धार केला. शापोरजी पालोनजी ग्रुपने पारशी समाजाच्या विकासासाठी सर्वाधिक देणगी दिली. सायरस या मंदिराचा खर्च उचलत होते
जून महिन्यातच झाले होते वडिलांचे निधन सायरस यांचे वडील व विख्यात उद्योगपती पालोनजी मिस्त्री (93) यांचे गत 28 जून रोजीच निधन झाले होते. आता सायरस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मातोश्री पाट्सी पेरिन डुबास, शापूर मिस्त्रींसह लैला मिस्त्री व अलू मिस्त्री या 2 बहिणी राहिल्या आहेत.
टाटा समूहाचे 6 वे अध्यक्ष होते सायरस रतन टाटा यांनी डिसेंबर 2012 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सायरस मिस्त्री यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले होते. सायरस टाटा सन्सचे सर्वात तरुण चेअरमन होते. मिस्त्री कुटुंबीयांची टाटा सन्समध्ये 18.4 टक्के भागिदारी आहे. ते टाटा ट्रस्टमधील टाटा सन्सनंतर दुसरे मोठे समभागधारक आहेत.