ETV Bharat / city

Covid-19 In India : कोरोनाचा आलेख घसरला, देशात 18 हजार 738 नवीन कोरोनाबाधित, 40 रुग्णांचा मृत्यू

Covid-19 In India : आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 18 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Covid-19 In India
Covid-19 In India
author img

By

Published : Aug 7, 2022, 10:24 AM IST

Updated : Aug 7, 2022, 10:45 AM IST

मुंबई - आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना (Corona Cases) व्हायरसची लागण झालेल्या 18738 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच सक्रिय रुग्णांच्या (Active Cases) संख्येत घट झाली असून ही संख्या 1,34,933 वर पोहोचली आहे. काल देशात 17,135 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच, केवळ 24 तासांतच बाधितांचा आकडा वाढून 19 हजारांवर पोहोचला आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 5,26,530 वर येऊन पोहोचली आहे.

मुंबईत शुक्रवारी 446 रुग्णांची नोंद, 288 कोरोनामुक्त - मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 446 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 288 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,04,549 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 656 झाली आहे. सध्या मुंबईत 2,391 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 446 रुग्णांमध्ये 408 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2483 दिवसांवर गेला आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबई शहरात - राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2391 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 3138 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 873 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 159, रायगड 247, रत्नागिरी 48, सिंधुदुर्ग 62, सातारा 111, सांगली 195, कोल्हापूर 153, सोलापूर 184, नाशिक 519, अहमदनगर 341, जळगाव 56, धुळे 96, औरंगाबाद 197, जालना 77, बीड 64, लातूर 196, परभणी 34, हिंगोली 26, नांदेड 85, उस्मानाबाद 161, अमरावती 124, अकोला 38, वाशिम 118, बुलढाणा 54, यवतमाळ 83, नागपूर 1294, वर्धा 90, भंडारा 289, गोंदिया 130, गडचिरोली 80 आणि चंद्रपूरमध्ये 145 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 11906 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात 2024 कोरोना रुग्णांची नोंद - राज्यात आज 2024 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2190 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यात आहेत.

हेही वाचा - Countdown for ISRO's maiden SSLV : इस्त्रोच्या उपग्रहाचे आज प्रक्षेपण

हेही वाचा - Suicide of Indian woman in New York : न्यूयाॅर्क शहरात भारतीय महिलेची आत्महत्या; मृत्यूपूर्वी छळाची व्हिडिओमधून दिली माहिती

Last Updated : Aug 7, 2022, 10:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.