ETV Bharat / city

Mumbai City Bank Scam : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आनंदराव अडसूळ यांच्या अटकपूर्व जामिनावर 'या' तारखेला निकाल

सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात ( Mumbai City Bank Scam ) शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ ( Shivsena Leader Anand Adsul ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका आज सोमवार (दि.31) रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली. या अटकपूर्व जामिनावर न्यायालयाने आज निकाल न देता 9 फेब्रुवारी ( Anand Adsul Pre Arrest Bail Result ) रोजी निकाल देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Mumbai
Mumbai
author img

By

Published : Jan 31, 2022, 9:54 PM IST

मुंबई - सिटी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात ( Mumbai City Bank Scam ) शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ ( Shivsena Leader Anand Adsul ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका आज सोमवार (दि.31) रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी दोन्ही पक्षकारांकडून आज युक्तिवाद पूर्ण झाला. या अटकपूर्व जामिनावर न्यायालयाने आज निकाल न देता 9 फेब्रुवारी रोजी निकाल देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता आनंदराव अडसूळ यांना ( Anand Adsul Pre Arrest Bail Result ) दिलासा मिळतो की अटक होते, हे महत्त्वाचं असणार आहे.

काय आहे प्रकरण -

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना 'ईडी'ने समन्स पाठवलं होतं. 27 तारखेला सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास ‘ईडी’ने त्यांना ताब्यात घेतलं.

कर्ज वाटपात अनियमिततेचा आरोप -

आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ‘ईडी’ त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि एनपीएमध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली, पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

हेही वाचा - Shiv Sena Support to Utpal Parrikar : शिवसेनेचा उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा; पणजीमधून घेतला उमेदवार मागे, राऊत म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.