मुंबई वांद्रे माउंट मेरी जत्रेमध्ये राजस्थानमधील एका दाम्पत्याला एका ३ वर्षीय मुलीची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अटक पतीचे नाव राकेश माळी असून सीता माळी असे पत्नीचे नाव आहे. Mumbai Crime पोलिसांनी गुन्ह्याच्या काही तासांतच पत्नी- पती या दोघांचा माग काढला. Mumbai Police परंतु, त्या आरोपीने सोने लपविण्यासाठी सोने चक्क गिळले असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या समोर आली आहे.
त्वरित आरोपीला सायन रुग्णालयात ( Sion Hospital Mumbai ) नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी एंडोस्कोपी प्रक्रियेनंतर सोने बाहेर काढले. राकेश आणि सीता हे राजस्थानमधील दूधवाला गावातील रहिवासी आहेत. माउंट मेरी फेअरला भेट देणाऱ्या लोकांकडून सोने चोरण्यासाठी ते नुकतेच त्यांच्या ८ महिन्यांच्या मुलासह मुंबईत आले होते. ते विरार रेल्वे स्थानकाजवळील फूटपाथवर राहत होते.
पोलिसांची माहिती पोलिसांनी सांगितले की, नालासोपारा येथील रहिवासी नारकर पती पत्नी आणि मुलगी तानिया दुपारी 3.30 च्या सुमारास वांद्रे जत्रेला आले होते. तासाभरानंतर त्यांच्या मुलीची चेन गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पालकांनी वांद्रे पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि तानियाच्या मागे एक असलेले जोडपे आढळले.
सोने गिळल्याचा प्रकार यात ती महिला प्रार्थना करत असताना सोनसाखळी हिसकावत असल्याचे दिसून आले होते. फुटेज पाहिल्यानंतर पोलीस पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. माग काढत पोलिसांनी संशयितांना ओळखले आणि त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांच्याकडून सोन्याची साखळी सापडली नाही. चौकशी केली असता पती राकेश माळी याने अटक टाळण्यासाठी ते गिळल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी राकेशला सायन रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी एन्डोस्कोपी करून काल पहाटे ४.३० च्या सुमारास सोनसाखळी काढली आहे. त्याच्या पचनसंस्थेत सोने अडकल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.