मुंबई - देशात आज 21411 कोरोना रुग्णांची ( Corona patient ) नोंद करण्यात आली आहे. तर 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार 20,726 रुग्णांना घरी सोडण्यात ( Corona patient discharges ) आले. तर 1,50,100 वर सक्रिय रुग्ण आहे. आणि सकारात्मकता दर 4.46 टक्के इतका आहे.
-
#COVID19 | India reports 21,411 fresh cases, 20,726 recoveries and 67 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Active cases 1,50,100
Daily positivity rate 4.46% pic.twitter.com/jxr8ep9utB
">#COVID19 | India reports 21,411 fresh cases, 20,726 recoveries and 67 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 23, 2022
Active cases 1,50,100
Daily positivity rate 4.46% pic.twitter.com/jxr8ep9utB#COVID19 | India reports 21,411 fresh cases, 20,726 recoveries and 67 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 23, 2022
Active cases 1,50,100
Daily positivity rate 4.46% pic.twitter.com/jxr8ep9utB
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ - राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.97 टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्क्यांवर पोहोचला आहे. गुरुवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. आज राज्यात 2515 नव्या रुग्णांची (Corona Update) भर पडली आहे तर 2449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
बीए 5 व्हेरियंटच्या दोन रुग्णांची भर - राज्यात आज बीए 5 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण परराज्यातील असून पुण्यात काही कामानिमित्ताने आले होते. राज्यात बीए 4 आणि बीए 5 रुग्णांची संख्या ही 160 वर पोहोचली आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 93 रुग्ण आढळतात. त्यानंतर मुंबईमध्ये 51 तर ठाणे 5, नागपूर आणि पालघरमध्ये प्रत्येकी 4 आणि रायगडमध्ये 3 रुग्णांची नोंद झाली आहे.
देशातील स्थिती - मागील 24 तासांत 21 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 60 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 1 लाख लाख 49 हजार 482 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मागील 24 तासांत 21 हजार 219 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 31 लाख 71 हजार 653 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. देशात एकूण 5 लाख 25 हजार 930 रुग्णांनी कोरोना संसर्गामुळे प्राण गमावला आहे.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या स्थिर; २९९ रुग्ण - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज २९९ रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २२२ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १० हजार ८१४ चाचण्या ( 10 thousand 814 Corona Test ) करण्यात आल्या. त्यात २९९ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. ३६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोना वाढीचा टप्पा - आतापर्यंत एकूण ११ लाख २२ हजार ४०८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ९०० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ८७१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २८०६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२५ टक्के इतका आहे.