ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊनच्या काळात कर्तव्यावर रुजू असलेल्या महाराष्ट्र पोलिसांपुढील समस्या आणि शासनाचे उपाय

author img

By

Published : May 1, 2020, 8:10 PM IST

कोरोना विषाणूच्या संकटकाळात राज्यातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस आत्यंतिक जबाबदारीने काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांभोवतीच आता कोरोनाचा विळखा आवळला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या परिस्थितीचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला आहे.

coronavirus lockdown etv bharat special story on maharashtra police and their families
कोरोना लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र पोलिसांपुढील समस्या आणि शासनाचे उपाय

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यासह देशभरात दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात तर कोरोनाचे देशातील सर्वाधिक रुग्ण आणि बळींची नोंद आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून आज (दि. 1 मे शुक्रवार) देशातील लॉकडाऊनमध्ये वाढ देखील करण्यात आली आहे. मात्र, मागील लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्र पोलीस विभागातही झाला असल्याचे दिसत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसात 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे पोलीस विभागात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लढाईमध्ये पोलीस दल अत्यंत कठीण परिस्थितीत आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. पोलिसांच्या पाठीशी सरकार देखील ठामपणे उभे असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, तरिही पोलीस कर्मचाऱ्यांबाबत सरकारने अधिक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्र पोलिसांकडून लॉकडाऊन दरम्यान राज्यभर कडेकोट पोलीस बंदोबस्त...

हेही वाचा... देशात ३ मे नंतरही दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला, केंद्र सरकारची घोषणा

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी मुंबई पोलीस खात्यात विशेष बदल

देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असून दरदिवशी शेकडो रुग्णांची भर पडत आहे. मुंबई शहरात 22 मार्चपासून संचारबंदी लागू असून कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी मुंबई पोलीस हे 24 तास रस्त्यावर पहारा देत आहेत. गेल्या काही दिवसात 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना संक्रमानामुळे मृत्यू झाल्याने पोलीस विभागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मुंबई पोलीस खात्यात 40 हुन अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वय हे 50 वर्षांपेक्षा अधिक असल्याने यावर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निर्देशानुसार मुंबई पोलीस खात्यात काही उपाययोजना करण्यात आले आहेत.

1. कामाच्या वेळात बदल.. 55 पेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश

मुंबई पोलीस खात्यात 55 वय पार केलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना घरी थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 52 वर्षे वय आणि मधुमेह, हायपर टेंशन यांसारखे आजार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे निर्माण होणाऱ्या पोलीस मनयुष्य बळाच्या समस्येवर मात करण्यासाठी मुंबईतील 94 पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. 12 तासांची ड्युटी केल्यावर 24 तासांची सुट्टी देण्यात आली आहे. या बरोबरच तब्बल 12 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हाड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. 20 हजार कर्मचाऱ्यांना मल्टी विटामिन आणि प्रोटीनचा पुरवठा करण्यात आला आहे.

2. कोरोना संक्रमित पोलिसांसाठी विशेष रुग्णालय

कोरोना संक्रमित पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी विशेष रुग्णालय स्थापित करण्यात आले आहे. प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. पोलीस नियंत्रण कक्षावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. याद्वारे संपर्क करणाऱ्या व्यक्तीच्या कोविड-19 बाबतीत असणाऱ्या प्रश्नांचे निरासरन करून योग्य ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

मुंबई पोलीस खात्यातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना पीपीई कीट, मास्क, हॅन्ड सॅनिटायझर, हातमोजे, सारख्या वस्तु देण्यात आल्या आहेत. मुंबईत विविध ठिकाणी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या नाकाबंदी ठिकाणी उन्हापासून त्रास होऊ नये, यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. त्याबरोबरच जेवणाची पाकीटे, गरम पाणी आणि इतर गोष्टी पोलिसांना पुरवण्यात येत आहेत. महत्वाचे म्हणजे प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला 50 लाखांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.

पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... 'कोरोनाने पोलिसांच्या कामाचे स्वरुप बदलले', मराठमोळे पोलीस आयुक्त महेश भागवत यांची खास मुलाखत

पुणे : कोरोना संसर्ग आणि कर्तव्य दक्ष पुणे पोलीस

पुणे शहरात कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. खास करून पुणे शहराच्या मध्य भागात कोरोनाचा कहर सुरु आहे. अरुंद रस्ते दाटीवाटीने असलेली लोकवस्ती, एकाच ठिकाणी कोंबुन ठेवल्यासारखे राहणारे नागरिक, नागरी सुविधांचा अभाव यामुळे पुण्यातल्या या हॉटस्पॉट असलेल्या पाच भागात परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, या ठिकाणची परिस्थिती पाहता नागरिक शिस्त पाळायला तयार नसल्याचे दिसत आहे. संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान नागरिक घराबाहेर पडत आहे, रस्त्यावर येत आहेत. एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांची खरी कसरत आहे. जीवावर उदार होऊन त्यांना या कोरोना बाधित हॉटस्पॉटमध्ये काम करावे लागत आहे. त्यामुळे पुण्यातील या पोलिसांची स्थिती काय आहे ? यावर आपण प्रकाश टाकणार आहोत.

1. पुण्यात दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोरोनाचा सर्वाधिक धोका

पुणे शहरातील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोरोनाचा संसर्ग सर्वात जास्त आहे. समर्थ, खडक आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर, स्वारगेट पोलीस ठाणे,लष्कर पोलीस ठाणे, बंडगार्डन पोलीस ठाणे, सहकारनगर पोलीस ठाणे, दत्तवाडी पोलीस ठाणे, येरवडा पोलीस ठाणे, खडकी पोलीस ठाणे हद्दीत करोनाचा सर्वाधिक धोका आहे. या ठिकाणी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना रोखण्यापासून ते कायदा सुव्यवस्था राखणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे की नाही, हे पाहणे. लॉकडाऊन काळात असामाजिक तत्वांना रोखणे, असे काम पोलिसांना स्वतःच्या जीवावर उदार होऊन करावे लागत आहे.

2. पुणे पोलिसांकरिता रुग्णलयात राखीव बेड

पुण्यात कोरोना बाधित क्षेत्रात काम करत असताना पुणे पोलिसांना देखील कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. आतापर्यंत पुणे पोलीस दलातील आठ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. पोलिसांच्या जीवाला असलेला हा धोका लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कामावर तैनात असलेल्या पोलिसांमध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यांचे तातडीने स्क्रिनिंग केले जात आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज पुरवण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी पुण्यातील सिम्बॉयसिस रुग्णालयातील 50 खाटांचा अद्यावत वार्ड राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच आणखी रुग्णालयात देखील पोलिसांसाठी वॉर्ड राखीव ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

3. पन्नास वर्षांपुढील पोलीस कर्मचाऱ्या फिल्डवर काम नाही

पुणे पोलिसांमध्ये पन्नाशीच्या पुढील पोलीस कर्मचाऱ्यांना, लहान मुले असलेल्या महिला पोलिसांना फिल्डवर न पाठवता ऑफिसमध्ये इतर महत्वाची कामे देण्याचा निर्णय घेतला आहे. तर निवृत्तीजवळ पोहचलेल्या तसेच इतर काही आजार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना रजा देण्यात आल्या आहेत. जेणे करून हे ज्येष्ठ पोलीस कर्मचारी आजार असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे होणाऱ्या संसर्गापासून वाचू शकतील. एकंदरीतच पुणे शहरात पसरलेला कोरोनाचा संसर्ग पोलीस दलातील कर्मचाऱ्यांपर्यंत आला आहे. पोलीस विविध उपाय योजना करताय आहेत. मात्र, तरिही या कठीण परिस्थितीत पुणे पोलीस धैर्याने काम करत असल्याचेच दिसून येत आहे.

औरंगाबादच्या पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... तीन तारखेनंतर अधिक मोकळीक मिळणार, निर्बंध शिथिल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, पण...

औरंगाबाद : पोलीस कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी, कोरोना योद्ध्यांच्या पाठीशी प्रशासन

कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक धोका पत्करून पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहे. मात्र, नागरिकांची सुरक्षितता सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. हा धोका लक्षात घेता औरंगाबाद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.

1. पोलिसांची आरोग्य आणि रोग प्रतिकारक शक्ती चांगली रहावीत यासाठी औषधे

राज्यात अनेक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न गृहविभाग करत आहे. रस्त्यावर दिवसरात्र नाकाबंदी असेल किंवा शहरात घालण्यात येणारी गस्त असेल, हे सर्व पोलीस विभागाकडून पार पाडले जात आहे. अनेकांशी दररोज येणारा संपर्क यामुळे पोलिसांना संसर्ग होऊ नये, यासाठी एक महिना आधीच पोलिसांना रोग प्रतिकार शक्ती चांगली असावी, यासाठीची औषधे देण्यात आली होती. त्यांनतर आता त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. तसेच पोलिसांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी त्यांचीही वैद्यकीय तपासणी सुरू केली असल्याची माहिती औरंगाबादच्या पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली.

2. पोलीस कुटुंबीयांची तपासणी सोबतच कोरोनाबाबत जनजागृती

औरंगाबाद पोलिसांतर्फे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस दलातील डॉक्टर आणि कर्मचारी पोलिसांच्या घरी जाऊन कोणाला काही आजार आहे किंवा काही त्रास आहे का ? याबाबत तपासणी करत आहेत. तसेच कोरोनाबाबत जनजागृती यानिमित्ताने केली जात आहे. पोलीस कर्मचारी कर्तव्यवरून घरी आल्यावर कोणती काळजी घेण्यात यावी, याबाबत डॉक्टर पोलीस कुटुंबियांना माहिती देत आहेत. पोलिसांचे कुटुंबीय त्या बरोबर प्रत्यक्ष बंदोबस्तासाठी तैणात कर्मचारी, यांचाही काळजी घेतली जात आहे.

शहरात उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे दुपारनंतर रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे राहणे अवघड होत आहे. त्यामुळे नाकाबंदी असलेल्या 50 ठिकाणी सावलीसाठी मंडप उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी पाणी आणि अन्नाचे पॅकेट पोहचवले जात आहेत. अशा पद्धतीने पोलिसांची काळजी घेतली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली.

नाशिक पोलिसांकडून लॉकडाऊन दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त...

हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलासा! विधान परिषदेची निवडणूक २१ मे ला होणार, आयोगाची सशर्त परवानगी

नाशिक : जीवावर उदार होऊन कर्तव्यावर रुजू असलेल्या पोलिसांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची गरज

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून लॉकडाऊनच्या काळात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील कोरोनाची लागण होत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 274 कोरोनाबाधित रुग्णामध्ये 46 पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीत आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. त्यामुळे पोलीस विभागाकडून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र हॉस्पिटलची मागणी होत आहे.

1. नाशिकमध्ये मालेगाव बनलंय कोरोनाचे हॉटस्पॉट

नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 297 वर जाऊन पोहचला आहे. एकट्या मालेगावमध्ये 274 रुग्ण असून 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मालेगावमध्ये बांदोबस्तासाठी तैनात असलेल्या 46 पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांनामध्ये नाशिक ग्रामीणचे 17 कर्मचारी, 1 पोलीस अधिकारी, एसआरपीएफचे 27 जवान, जळगाव पोलीस प्रशिक्षणार्थी 1 कर्मचारी यांचा समावेश आहे.

2. मालेगावमध्ये बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा

मालेगावमध्ये कोरोना वाढता संसर्ग पाहता येथे 1800 पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच मुंबई, जालना, धुळे येथील एसआरपीएफच्या सात तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तुकडीत 90 पोलिसांचा समावेश आहे. यातील अनेक पोलिसांना कोविड-19 रुग्णालय, कोरोना हॉटस्पॉटचे ठिकाण आणि चेकपोस्ट नाका येथे तैनात करण्यात आले आहे. तसेच प्रत्येकाला 12 तासांची ड्युटी देण्यात आली आहे. जिलह्यात बाहेरच्या शहरातून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची मालेगावातील काही मंगल कार्यालयात राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलिसांना जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मास्क, सॅनिटाझर, व्हिटामिन सी चा पुरवठा केला जात आहे. तसेच आतापर्यंत टप्याटप्याने सर्वच पोलिसांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.

3. पहिल्या फळीत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पीपीई कीट

मालेगावमध्ये सामान्य रुग्णालय, मन्सूरा हॉस्पिटल, जीवन हॉस्पिटल आणि ए. टी. पी. कॉलेज येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. ह्या प्रत्येक रुग्णालयासाठी 15 पोलिसांची नेमणूक करण्यात आली असून पहिल्या फळीत काम करणाऱ्या या पोलीसांना पीपीई किट देण्यात आले आहे. तसेच 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना संचारबंदीत बंदोबस्त वगळून पोलीस ठाण्यात हलक्या स्वरूपाची कामे देण्यात आली असल्याचे पोलीस विभागाने सांगितले आहे.

4. नाशिक शहरात पोलीस कर्मचाऱ्यांना आठ तासाची शिफ्ट

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मालेगावपेक्षा कमी आहे. नाशिकमध्ये 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यातील 3 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सुदैवाने नाशिक शहरात एकही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही. सध्या नाशकात संचारबंदीसाठी आणि पोलीस ठण्यात असे 3 हजार पोलीस कार्यरत आहे. पोलिसांवरील ताण कमी व्हावा, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला आठ तासांची शिफ्ट ठरून दिली आहे. तसेच प्रत्येक पोलिसांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलिसांना मास्क तसेच सॅनिटाझर आणि व्हिटॅमिन सी च्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्यासोबत 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यातच हलक्या स्वरूपाचे काम देण्यात आले आहे.

5. नाशिक पोलिसांसाठी स‌ॅनिटायझर व्ह‌ॅन

नाशिक शहरात 40 ठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिसांसमवेत होमगार्ड आणि एसपीओ (स्पेशल पोलीस ऑफिसर) म्हणून काही सामाजिक कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत. नाशिकच्या डॉ. झाकिर हुसेन हॉस्पिटल आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी देखील प्रत्येकी 10 पोलीस नियुक्त करण्यात आले असून त्यांना पीपीई किट देण्यात आले आहेत. तसेच पोलिसांच्या सुरक्षेसाठी तीन मोबाइल सॅनिटाझर व्हॅन तयार करण्यात आहेत. कामावरुन घरी आल्यावर आणि घरी जातांना पोलीस कर्मचारी या सॅनिटाझर व्हॅनचा वापर निर्जंतुकीकरण करुन घेण्यासाठी करतात.

हेही वाचा... कामगारांचं लॉकडाऊन : 'केंद्र सरकारने फक्त तांदूळ दिले; डाळ दिली नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.