मुंबई - सोमवारी दिवसभरात ७ हजार ६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५ हजार २७७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोनाचे रोज ८ ते ९ हजार रुग्ण आढळून येत आहेत. तसेच १२० ते २०० मृत्यू होत होते. आज रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. आज ७६०३ नवे रुग्ण आढळून आले असून ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १५ हजार २७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या १ लाख ८ हजार ३४३ सक्रिय रुग्ण असून मृत्यू दर २.०४ टक्क्यावर स्थिरावला आहे.
राज्याची आकडेवारी -
कोरोनामुळे गेल्या २४ तासांत ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने राज्यात १ लाख २६ हजार २४ रुग्णांचा बळी घेतला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. दिवसभरात ७ हजार ६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५ हजार २७७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ५९ लाख २७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के एवढे आहे. आजपर्यंत कोरोनाच्या ४ कोटी ४१ लाख ८६ हजार ४४९ चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी ६१ लाख ६५ हजार ४०२ (१३.९५ टक्के) रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८२ हजार ४७६ व्यक्ती होमक्वारंटाइन तर ४ हजार ६५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १ लाख ८ हजार ३४३ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
..या जिल्ह्यात रुग्णसंख्या अधिक -
- मुंबई - ४९६
रायगड - २६८
अहमदनगर - ३१६
पुणे - ४२०
पुणे पालिका - २०७
पिंपरी चिंचवड - २०४
सोलापूर - ३२३
सातारा - ५६९
कोल्हापूर - १६४०
कोल्हापूर पालिका - ३०७
सांगली - ८५८
रत्नागिरी - २८९
जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या
- 12 जुलै - 7603 नवे रुग्ण
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10 जुलै - 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
2 जुलै - 8753 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण