ETV Bharat / city

मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात 'ड्राय रन' यशस्वी - मुंबई महापालिका रुग्णालय ड्राय रन न्यूज

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आज कोरोना लसीकरणासाठी कूपर राजावाडी रुग्णालय आणि बिकेसी जम्बो कोविड सेंटर येथे ड्राय रन घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

कोरोना लस ड्राय रन
कोरोना लस ड्राय रन
author img

By

Published : Jan 8, 2021, 3:31 PM IST

Updated : Jan 8, 2021, 4:10 PM IST

मुंबई - कोरोनाच्या लसीसाठी प्रतिक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत महापालिकेच्या अखत्यारीतील कूपर राजावाडी रुग्णालय आणि बिकेसी जम्बो कोविड सेंटर येथे कोरोना चाचणीसाठी 'ड्राय रन' घेण्यात आला. त्यापैकी राजावाडी रुग्णालयात ड्राय रन यशस्वी झाली आहे. येत्या लसीकरण कार्यक्रमासाठी राजावाडी रुग्णालय सज्ज असल्याची माहिती अधिक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आज कोरोना लसीकरणासाठी कूपर राजावाडी रुग्णालय आणि बिकेसी जम्बो कोविड सेंटर येथे ड्राय रन घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी पालिका आणि सरकारच्या सूचनेनुसार पाच केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

राजावाडी रुग्णालयात 'ड्राय रन' यशस्वी

अशी आहे लस घेण्याची प्रक्रिया-

  • लस घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थीच्या मोबाईलवरील संदेश सुरक्षा रक्षक तपासतात.
  • लाभार्थीचे ओळखपत्र तपासले जाते.
  • त्यांना माहिती देऊन टोकन नंबर दिला जातो.
  • त्यानंतर प्रतीक्षा कक्षात बसवले जाते.
  • टोकन नंबर आल्यावर त्या लाभार्थीला लसीककरण कक्षात पाठवले जाते.
  • लसीकरण कक्षात ऍपवर त्या लाभार्थींची माहिती भरल्यावर त्यांना लसीकरण करणाऱ्या नर्सकडे पाठवले जाते.
  • त्या लाभार्थीला लस दिल्यानंतर अर्धा तास प्रतीक्षाकक्षात बसविण्यात येते.

लस घेणाऱ्या व्यक्तीला काही त्रास झाल्यास तेथे उपलब्ध असलेल्या डॉक्टरांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात येणार आहे. प्रतिक्षा कक्षात डॉक्टर आणि इतर कर्मचारी लाभार्थीची अर्ध्या तासांनी विचारपूस करतील. त्या लाभार्थ्यांला काही त्रास नसल्यास त्यांना घरी पाठवले जाईल. जर काही त्रास जाणवल्यास डॉक्टर सज्ज असल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली. आयसीयूमध्ये २ बेड राखीव ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-राज्यातील 30 जिल्हे, 25 महानगरपालिका क्षेत्रात उद्या कोरोना लसीचे ड्राय रन

पहिल्या टप्प्यात कोरोना कर्मचाऱ्यांना लस -
राजावाडी रुग्णालयात लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात जागेच्या उपलब्धतेनुसार पाच बूथ सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर दिवसाला २०० याप्रमाणे पाच बूथवर १ हजार लोकांना लस दिली जाऊ शकते. सध्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याची माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली.

हेही वाचा-मुंबईत कोरोना लसीकरणाचा सराव यशस्वी; वेध प्रत्यक्ष लसीकरणाचे

आत्मविश्वास वाढविण्यासाठी ड्राय रन -
कोवीन अ‌ॅप किती सोयीस्कर व उपयोगी हे तपासण्यासाठी ड्राय रन महत्त्वाचे आहे. कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे व सर्व बाबींची पडताळणी ड्राय रनमधून करणे शक्य आहे. तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे यासाठी ड्राय रन घेतला जात आहे. लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ड्राय महत्त्वाचा असल्याचे राजावाडी रुग्णालयाचे अधिक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थितीत सिरमने उत्पादित केलेली ऑक्सफोर्डची लस व भारत बायोटेकची लस वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळले असताना मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Last Updated : Jan 8, 2021, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.