मुंबई - कोरोनाची लाट काही प्रमाणात कमी झाल्यानंतर राज्यातील निर्बंध शिथिल होत आहेत. येत्या शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. (Shiv Jayanti celebrations 2022) त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावलीत काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार शिवज्योत आणि जन्मोत्सव दरम्यान दोनशे ते पाचशे लोकांना उपस्थित राहता येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली
येत्या शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे यांनी चिंता शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष भाग म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. (Corona restrictions in the state have been relaxed) मुख्यमंत्र्यांनी यावर सहमती दर्शवली आहे. तसेच, निर्देश राज्याच्या गृह विभागाचे संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.
स्वच्छतेची काळजी घेत शिवजयंती साजरी करा
शिवजयंती उत्सवासाठी विविध शिवप्रेरणा स्तरावरून शिवज्योती वाहून आणली जातात. त्यासाठी शिवज्योती दवडीत दोनशे जणांना सहभागी होता येणार आहे. तर, शिवजन्मोत्सव सोहळ्यात पाचशेजण उपस्थित राहू शकणार आहेत. आरोग्य नियमांचे पालन करून सर्वांनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : हम डरेंगे नहीं! संजय राऊत आक्रमक, उद्या घेणार पत्रकार परिषद