ETV Bharat / city

कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली, धारावीकरांची पुन्हा स्क्रिनींग सुरू - धारावीतील कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली

पुन्हा या धारावीत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यासाठी महापालिका प्रशासन पुन्हा सतर्क झाली असून पुन्हा धारावीमधील नागरिकांची स्क्रिनींग सुरू केल्याची माहिती पालिकेचे जी नॉर्थचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

धारावी कोरोना रुग्ण
धारावी कोरोना रुग्ण
author img

By

Published : Mar 5, 2021, 4:13 PM IST

मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट झालेली ही सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी मॉडेलच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनमुक्त झाली. मात्र, पुन्हा या धारावीत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यासाठी महापालिका प्रशासन पुन्हा सतर्क झाली असून पुन्हा धारावीमधील नागरिकांची स्क्रिनींग सुरु केल्याची माहिती पालिकेचे जी नॉर्थचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

धारावीत पुन्हा रुग्ण वाढले -

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीचा उल्लेख केला जातो. या धारावीत सुमारे दहा लाख लोक राहतात. मुंबईत गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यावर धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट बनली होती. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी पालिकेने धारावी मॉडेल राबविले होते. नागरिकांची स्क्रिनींग करून पॉझिटिव्ह येणाऱ्या आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले गेले. क्वारंटाईन सेंटमध्येच उपचार केले गेल्याने धारावीमधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या दिड ते दोन महिन्यात धारावीत सहा वेळा शून्य रुग्णांची नोंदणी झाली आहे. मात्र याच धारावीत १ मार्चला ११, २ मार्चला ८, ३ मार्चला १४, ४ मार्चला ९ रुग्ण आढळून आले असून सध्या ७३ सक्रिय रुग्ण आहेत.

कठोर अंमलबजावणी -

धारावीत ४ मार्चच्या आकडेवारीनुसार ७३ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्यासाठी पुन्हा धारावी हॉटस्पॉट असताना ज्या उपाययोजना राबवल्या त्या पुन्हा राबवल्या जात आहेत. धारावीत राहणाऱ्या सर्व नागरिकांची स्क्रिनींग केली जात आहे. संशयित रुग्णांचे ऑक्सिजनची मंत्रात तपासली जात आहे. त्यांच्या शरीराचे तापमान तपासले जात आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या १५ ते २० जणांना क्वारंटाईन केले जात आहे. धारावी मॉडेल पुन्हा राबवले जात असल्याची माहिती किरण दिघावकर यांनी दिली. दादर येथील दादर वनिता समाज येथेही महिनाभरापूर्वी दोन ते तीन रुग्ण आढळून येथ होते त्याठिकाणी आतापर्यंत १०० रुग्ण आढळून आले आहेत. त्यासाठी दादर आणि माहीम विभागातीही पालिकेकडून कठोर अंमलबजावणी केली जात असल्याचे दिघावकर यांनी सांगितले.

केंद्रीय पथक आलेच नाही -

धारावी सारख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिव स्तरीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीने मुंबईमध्ये दोन दिवसापूर्वी आली. या समितीने सध्या हॉटस्पॉट असलेल्या चेंबूर विभागाला भेट दिली. या भेटीदरम्यान ही समिती धारावीला भेट देणार होती. मात्र चेंबूरमध्येच उशीर झाल्याने या समितीने धारावीला भेट दिलेली नाही. ही समिती पुन्हा कशी भेट देणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही असे दिघावकर यांनी सांगितले.

सध्याची रुग्णसंख्या

धारावी -
एकूण रुग्णसंख्या - ५१४२
बरे झालेले रुग्ण - ४८३२
सक्रिय रुग्ण - ७३

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.