ETV Bharat / city

Rajesh Tope On Covid : कोरोना रुग्णांच्या संख्येत सात पटीने वाढ होऊ शकते, आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली भीती - Covid Patients Doubling Rate

कोरोनाची तिसरी लाट ( Covid Third Wave ) येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णसंख्या सातपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली ( Rajesh Tope Covid Forecast ) आहे. मुंबईमध्येही कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट वाढून ( Mumbai Covid Positivity Rate ) आकडा २२०० पर्यंत जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

राजेश टोपे
राजेश टोपे
author img

By

Published : Dec 29, 2021, 3:10 PM IST

Updated : Dec 29, 2021, 3:32 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. २० डिसेंबर रोजी मुंबई दोनशे रुग्ण सापडले होते. मात्र त्या मानाने उद्यापर्यंत तो आकडा २२०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ( Covid Third Wave ) सात पटीने रुग्ण संख्या वाढण्याची भीती आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली ( Rajesh Tope Covid Forecast ) आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट चार टक्के झाला असून, हा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के झाल्यास ( Mumbai Covid Positivity Rate ) मुंबईसाठी धोक्याची घंटा असल्याचा इशाराही राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत सात पटीने वाढ होऊ शकते, आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली भीती

..तर खूप मोठी किंमत मोजावी लागेल

मुंबईत रोज सरासरी ५१ हजार टेस्ट ( Mumbai Daily Covid Tests ) केल्या जातात. तसेच नागरिकांनी सतर्कता पाळून राज्य सरकार तसेच प्रशासनाने जे नियम घालून दिले ( State Government Covid Guidelines ) आहेत, त्याचे काटेकोर पालन करावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्यामुळे दिल्लीमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लावावे लागले ( Covid Restrictions Delhi ) आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांबाबत गांभीर्य पाळले नाही तर, आपल्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भीती देखील आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच लग्नसोहळे, समारंभ मोठ्या प्रमाणात होत आहेत. या लग्न सोहळ्यात समारंभावर देखील बंधने आणण्याची आवश्यकता असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. नागरिकांना गर्दी टाळावी लागेल. ज्या गतीने आज रुग्ण वाढत आहे ती धोक्याची घंटा आहे, अशी भीती आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच ज्या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या देशातून राज्यांमध्ये येणाऱ्या नागरिकांचे स्क्रिनिंग सुरू आहे. मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

ओमायक्रॉनमुळे कोणाचेही निधन नाही

आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनचे १६७ रुग्ण सापडले ( Omicron Patients In Maharashtra ) आहेत. या रुग्णांपैकी ९१ रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. तसेच अद्याप ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे कोणत्याही रुग्णांचे निधन झाले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात साडेपाच कोटी लोकांचे दोन्ही डोस पूर्ण

राज्य सरकार लसीकरणावर ( Covid Vaccination In Maharashtra ) मोठ्या प्रमाणात भर देत असून, आतापर्यंत राज्यात आठ कोटी नागरीकांचा पहिला डोस घेतला आहे. मात्र राज्यातील नऊ कोटी लोकांचा पहिला डोस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारचे असून, अजून एक कोटी लोकांचा पहिला डोस शिल्लक असल्याचं यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच राज्यातील साडेपाच कोटी नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, सामाजिक संस्थांच्या मदतीने घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना यावेळी दिली.

३ जानेवारी पासून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

राज्यात तीन जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार ( Childrens Vaccination From 3 January ) आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत लस दिली जाऊ शकते ( Covid Vaccination At School ) का? याची देखील चाचपणी राज्य सरकारकडून केली जात असल्याचं यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकारची टीमचा राज्यात दौरा

वाढत्या रुग्ण संख्येमुळे केंद्र सरकारची टीम देखील राज्यात दौरा करत आहे. राज्याचे आरोग्य विभाग तयारीत असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नका, फक्त काळजी घ्या. रुग्णाचा डबलिंग रेट ( Covid Patients Doubling Rate ) वाढत आहे ही चिंतेची बाब असून, दिवसाला ७०० मेट्रिक टनापर्यत ऑक्सिजनचा वापर वाढला की, आपण लॉकडाऊन करतो. पण आता तशी परिस्थिती नसल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Omicron Test : ' ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय हे ओळखण्यासाठी ही टेस्ट करा

Last Updated : Dec 29, 2021, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.