मुंबई- देशात पहिल्यांदाच १०९ दिवसानंतर कोरोना रुग्णांची एका दिवसात वाढलेली संख्या १० हजारांहून अधिक झाली आहे. यापूर्वी २६ फेब्रुवारी रोजी २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांहून अधिक होती. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ४,०२४ आहे. तर पॉझिटिव्हिटी दर ३६ टक्के आहे.
देशात कोरोनाचे नवे 12,213 रुग्ण आहेत. तर ७,६२४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे ५८,२१५ सक्रिय रुग्ण आहेत. देशात पॉझिटिव्हिटीचा दर २.३५ टक्के आहे.
-
#COVID19 | India reports 12,213 new cases & 7,624 recoveries, in the last 24 hours.
— ANI (@ANI) June 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Active cases 58,215
Daily positivity rate 2.35% pic.twitter.com/yL8XVI0RHf
">#COVID19 | India reports 12,213 new cases & 7,624 recoveries, in the last 24 hours.
— ANI (@ANI) June 16, 2022
Active cases 58,215
Daily positivity rate 2.35% pic.twitter.com/yL8XVI0RHf#COVID19 | India reports 12,213 new cases & 7,624 recoveries, in the last 24 hours.
— ANI (@ANI) June 16, 2022
Active cases 58,215
Daily positivity rate 2.35% pic.twitter.com/yL8XVI0RHf
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढ होत आहे. राज्यात २४ तासांत ४०२४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. असे असले तरी ही रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तर दुसरीकडे दुसरीकडे दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉन ( Omicron ) या व्हायरसचे व्हेरीएंट आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यात अद्याप कोणताही नवीन व्हायरस आढळून आलेला नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
मुंबईत बुधवारी आढळले २२९३ नवे रुग्ण- मुंबईत सध्या ५१६ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ६० रुग्ण ऑक्सिजनवर, १०८ रुग्ण आयसीयूमध्ये तर १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोना रुग्णांचा शोधासाठी चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १७ हजार १३९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२९३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १३.३७ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. बुधवारी एका मृत्यूची नोंद झाली आहे. १७६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईत कोरोनाचे १२ हजार ३४१ सक्रिय रुग्ण - आतापर्यंत १० लाख ८५ हजार ८८२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ५३ हजार ९६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२ हजार ३४१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४३८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१५५ टक्के इतका आहे. मुंबईत कोरोनामुळे एका रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली महिला रुग्ण असून त्या ६० वर्षावरील वयोवृद्ध होती. तीला दीर्घकालीन आजार होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.मुंबईमध्ये मे महिन्यापासून पुन्हा कोरोना विषाणूने डोकेवर काढले ( Corona Increasing in Mumbai ) आहे.
दिल्लीत 24 तासांत कोविड-19 चे 1,375 रुग्ण- दिल्लीत कोविड-19 चे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 1,375 रुग्ण आढळले आहेत. संसर्ग दर 7.01 टक्के नोंदवला गेला आहे. याशिवाय गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. यापूर्वी 7 मे रोजी कोविड-19 चे 1,407 रुग्ण आढळले होते. 4 एप्रिलपासून संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यांहून अधिक राहिले आहे. त्याच वेळी, संसर्ग दर 7.01 टक्के नोंदवला गेला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता तीन हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3,643 वर पोहोचली आहे. याशिवाय गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. त्यानंतर एकूण मृतांचा आकडा 26,223 राहिला आहे. त्याच वेळी, 2,108 रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.
१५ जूनला कोरोनाचे नवे ८८२२ रुग्ण-१५ जूनच्या आकडेवारीप्रमाणे कोरोनाचे देशात ८८२२ रुग्ण , २.०५ पॉझिटिव्हिटी दर ( corona cases in Maharashtra ) आढळला आहे. मुंबईत रोज १७०० ते १९०० रुग्णांची ( New corona case new Mumbai ) नोंद होत आहे. कोरोनाचे देशात ८८२२ रुग्ण २४ तासात आढळले आहेत. ५७१८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-corona update today : कोरोनाचे देशात ८८२२ रुग्ण, मुंबईत रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद
हेही वाचा-Mumbai Corona Update : २२९३ नवे रुग्ण, १०८ रुग्ण ऑक्सिजनवर, १२ व्हेंटिलेटरवर
हेही वाचा-कोरोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचेच व्हेरीएंट, अद्याप कोणताही नवीन व्हायरस नाही - आरोग्यमंत्री