ETV Bharat / city

#MHCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर...

author img

By

Published : Jun 19, 2021, 6:29 AM IST

Updated : Jun 19, 2021, 5:49 PM IST

corona live updates
corona live updates

17:48 June 19

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने सर्वांनीच दक्षता घ्यावी - पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक - जिल्ह्यात गेले अनेक महिने शासन, प्रशासनाने केलेल्या अविश्रांत प्रयत्नातून व नागरिकांनी पाळलेल्या संयमातून पॉझिटिव्हिटी दर बऱ्यापैकी कमी झालेला आहे. आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा व शहर कोरोना सद्यस्थिती उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. 

17:23 June 19

लोकल सुरू करण्याचा, निर्बंध हटवण्याचा निर्णय तज्ज्ञांशी बोलूनच - आदित्य ठाकरे

मुंबई - मुंबईत सध्याही कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंधांची आवश्यकता आहे. मुंबईमधील लोकल सुरू करणे किंवा निर्बंध हटवणे याबाबत जो काही निर्णय होईल तो आरोग्य विभागातील तज्ज्ञांशी बोलूनच होईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

16:57 June 19

नागपूरमध्ये कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयानक

नागपूर - नागपूर जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेत दररोज मृत्यूने शंभरी गाठलेले शहर म्हणून पाहायला मिळाले. एकाच दिवसात 112 जण हे कोरोनाने मृत्यू झालाले नागपूरकरांनी पाहिले आहेत. दिवस-रात्र पेटलेले स्मशान पाहिले. दरम्यानच्या काळात एप्रिल महिन्यात उपराजधानीवर मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. तेच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारताना दिसली. 18 जूनला आलेल्या अहवालात मृत्यूची संख्या शून्य होती. पण असे असले तरी फेब्रुवारीनंतरच्या साडेचार महिन्यात 4 हजार 824 मृत्यू झाले आहेत.

16:16 June 19

वाशिम जिल्ह्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील लसीकरणास सुरुवात

वाशिम - कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आज, १९ जूनपासून ३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.

15:27 June 19

साताऱ्यात बाजारपेठा सोमवार ते शुक्रवार उघडणार; सायंकाळनंतर संचारबंदी

सातारा - जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती सुधारल्याने तब्बल दोन महिन्यानंतर, सोमवारपासून बाजारपेठा खुल्या होणार आहेत. ही सवलत मर्यादित स्वरुपात देण्यात आली असली तरी बाजारपेठेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सायंकाळनंतरची संचारबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

14:50 June 19

नागपुरात आजपासून ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू

नागपूर - राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार ३० वर्ष ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण आजपासून नागपूर महानगरपालिकेच्या ८१ केंद्रांवर सुरू झाले आहे. प्रत्येक केंद्रावर १०० नागरिकांना लस दिली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे. 

09:47 June 19

देशात शुक्रवारी 60 हजार रुग्णांची नोंद, तर 1 हजार 647 रुग्ण दगावले

देशात गेल्या 24 तासांत देशात 60 हजार 753 कोरोना ढळले असून 97 हजार 743 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 1 हजार 647 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 2 कोटी 9 लाख 23 हजार 546वर पोहोचली आहे. तर, 3 लाख 85 हजार 137 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

06:19 June 19

राज्यात १४ हजार रुग्ण झाले बरे, तर ९ हजार ७९८ रुग्णांची नव्याने नोंद

मुंबई - मागील २४ तासांमध्ये राज्यभरात १४ हजार ३४७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ९ हजार ७९८ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १९८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,९९,९८३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.७३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के एवढा आहे.

Last Updated : Jun 19, 2021, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.