ETV Bharat / city

Corona Increasing in Mumbai : कोरोना वाढताना मुंबईतील एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही, "ही" आहेत कारणे - कोरोना वाढतोय तरीही इमारत सील नाही

मुंबईत सध्या कोरोना ( Corona ) रुग्णात वाढ होत ( Corona Increasing in Mumbai ) आहे. मात्र आज सध्या मुंबईमधील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही. इमारती आणि मायक्रो कंटेंटमेंट झोन सील करण्याबाबत नव्या गाईडलाईनची अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे मुंबईतील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Corona Increasing in Mumbai
मुंबई कोरोना
author img

By

Published : Jun 14, 2022, 8:58 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये मे महिन्यापासून पुन्हा कोरोना विषाणूने डोकेवर काढले ( Corona Increasing in Mumbai ) आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना रुग्ण आढळून येणारी इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात येत होती. मात्र सध्या कोरोना रुग्ण आढळून आलेली मुंबईमधील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही. इमारती आणि मायक्रो कंटेंटमेंट झोन सील करण्याबाबत नव्या गाईडलाईनची अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे मुंबईतील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Corona Increasing in Mumbai
मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ

मुंबईत कोरोनाचा प्रसार - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर मुंबईत तीन लाटा येऊन गेल्या. पहिल्या लाटेत दिवसाला २८००, दुसऱ्या लाटेत ११ हजार तर तिसऱ्या लाटेत २१ हजार असे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या तीनही लाटा थोपवण्यात राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला यश आले आहे. आतापर्यंत १० लाख ८० हजार ७४७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. १० लाख ५० हजार २८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १९ हजार ५७३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Corona Increasing in Mumbai
मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ

सद्धा इमारत, झोपडपट्टी सील नाही - मुंबईत मागील वर्षी डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली होती. जानेवारीत ही लाट आटोक्यात आली. त्यानंतर मेमध्ये दिवसाला ५० हून कमी रुग्णांची नोंद होत होती. मे पासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. जूनमध्ये दिवसाला १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पॉजिटीव्ह येणाऱ्या रुग्णांना घरीच होम क्वारंटाईन केले जात आहे. पॉजिटीव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात असले तरी मुंबईतील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही.

सील करण्याची नियमावली - मुंबईत मार्च २०२० पासून तिसऱ्या लाटेपर्यंत २७९८ झोपड्या सील करण्यात आल्या होत्या. ६६ हजार ३३६ इमारती आणि मायक्रो कंटेंटमेंट झोन सील करण्यात आले होते. पहिल्या लाटेत इमारत किंवा झोपडपट्टीत एक रुग्ण आढळून आला. तरी ती सील केली जात होती. त्यातनंतर बदल करून एका इमारतीत ५ रुग्ण आढळून आल्यास इमारत सील केली जात होती. मात्र तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारादरम्यान इमारत आणि झोपडपट्टी सील करण्याबाबत नवीन गाईडलाईन तयार करण्यात आली. त्यानुसार एका इमारतीत २० टक्के घरांमध्ये पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आल्यास किंवा एका घरात १० रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आल्यास इमारत सील करण्यात येईल अशी नियमावली करण्यात आली आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

म्हणून इमारती सील नाहीत - मुंबईत सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी ९६ ते ९७ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची किंवा ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही. त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. यामुळे मुंबईत रुग्णसंख्या वाढली तरी भीतीचे कारण नाही. पालिकेचे त्यावर लक्ष आहे. नवीन नियमावली प्रमाणे २० टक्के घरांमध्ये रुग्ण आढळून आले तरच इमारत सील करता येते. या नियमावलीमुळे मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

१० लाख ८१ हजार रुग्णांना कोरोना - मुंबईत मार्च २०२० पासून आतापर्यंत एकूण १० लाख ८१ हजार ८६५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ५० हजार ९६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ११ हजार ३३१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४७५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१४४ टक्के इतका आहे. रुग्णालयांमध्ये २४ हजार ८७७ बेड्स असून त्यापैकी ४७८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ३३ रुग्ण ऑक्सिजनवर, ६४ रुग्ण आयसीयूमध्ये तर ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

९९ टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण - मुंबईत मे महिन्यापासून पुन्हा कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा सुरु झाला आहे. त्या अनुषंगाने पालिकेच्या आरोग्य विभागाने जिनोम सिक्वेन्सिंगच्या १२ व्या फेरीतील चाचण्या केल्या. यात मुंबईमधील २०२ नमुन्यांपैकी ९९.५ टक्के अर्थात २०१ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या व्हेरियंटने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. बीए ४ चे तीन आणि बीए ५ व्हेरीयटंचा १ असे ४ रुग्ण आढळून आले आहेत. बीए व्हेरियंटचे हे चारही मे महिन्यात आढळून आले होते. हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. एक नमुना हा 'डेल्टा' या व्हेरियंटने बाधित आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली ( 99 Percent Omicron Cases In Mumbai ) आहे.

अशी रुग्णसंख्या वाढतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६, ११ जूनला १७४५, १२ जूनला १८०३, १३ जूनला १११८ रुग्णांची नोंद झाली आहे.

१०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - 3 Drowned at Juhu : जुहू चौपाटीवर ३ जण बुडाले; बीएमसीचे चौपाटीवर न जाण्याचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.