मुंबई - साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हिंदू नववर्षांचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाढवा. या मुहूर्तावर सोने खरेदी ही मोठ्या प्रमाणात होते. मात्र, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे सावट आहे. तसेच संचारबंदी असल्यामुळे सराफा मार्कट बंद आहेत. यामुळे महाराष्ट्रात 150 ते 200 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत मुंबई जेव्हलर्स असोसिएशनचे कुमार जैन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...
दरम्यान, हा मुहूर्त साधण्यासाठी महिनाभर आधीच, तर महिनोमहिने नियोजन सुरू असते. मात्र, सध्या देशभरात कोरोनाचे संकट असल्यामुळे देशभरात लॉकडॉऊन करण्यात आले आहे. कोरोनाचे प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घेतलेला निर्णय खूप योग्य आहे. गुडीपाढव्यानिम्मित सराफा मार्केटमध्ये मोठी उलाढाल होते. मात्र, यावेळी महाराष्ट्रात 150 ते 200 कोटींचे नुकसान झालं आहे. तसेच कोरोनाबाबतही आम्ही विशेष काळजी घेत आहोत. तसेच ज्यांचे पोट हातावर आहे, .त्यांच्यासाठीही विशेष सोय केली आहे. त्यांन्याआम्ही आगाऊ पगार दिला आहे. जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा सोन्याचा दर 50 हजारांच्या घरात पोहचेल, असा अंदाजही कुमार जैन यांनी व्यक्त केला आहे.