ETV Bharat / city

Corona Update : मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १८ दिवसांत ३९७३ वरून ५६१ दिवसांवर घसरला - मुंबईतील कोरोना दुपटीचा दर वाढला

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोना विषाणूच्या तीन लाटा येवून गेल्या. फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्या घटू लागली. मात्र मे अखेरपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. एप्रिलमध्ये ३० ते ३५ वर असलेली रुग्णसंख्या आता सुमारे दोन हजाराच्या घरात गेली आहे.

corona file photo
कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Jun 12, 2022, 7:57 PM IST

मुंबई - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोना विषाणूच्या तीन लाटा येवून गेल्या. फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्या घटू लागली. मात्र मे अखेरपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. एप्रिलमध्ये ३० ते ३५ वर असलेली रुग्णसंख्या आता सुमारे दोन हजाराच्या घरात गेली आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही मागील १८ दिवसांत ३९७३ वरून ५६१ दिवसांवर जवळपास सात पट्टीने खाली घसरला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढते आहे.

कोरोना पसरला - मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्य़ाने वाढली. त्यामुळे पहिल्या लाटेत कडक लॉकडाऊन लावण्यात आले. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या तब्बल ११ हजारावर तर तिसऱ्या लाटेत २१ हजारावर पोहचल्याने यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले. मात्र प्रभावी उपायोजना, उपचार पद्धती, नियमांची कडक अंमलबजावणी, संशयित रुग्णांचा युद्धपातळीवर शोध, नियमित हेल्थ कॅम्प, लसीकरण मोहिम आदी प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या तीन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले.

रुग्ण दुपटीचा कालावधी घसरला - या वर्षी फेब्रुवारीनंतर मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली. त्यामुळे निर्बंधही हटवण्यात आले. सर्व व्यवहार सुरळीत झाले. एप्रिलमध्ये रोजची रुग्णसंख्या ३० ते ३५ वर आली. त्यानंतर मे महिन्यापासून रुग्णसंख्या ७० वर स्थिर राहिली. मात्र मे अखेरनंतर आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रोजची रुग्णसंख्या दोन हजारच्या जवळपास पोहचली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही मागील १८ दिवसांत ३९७३ वरून ५६१ दिवसांवर म्हणजे सात पटीने घसरला आहे. २५ मे रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ३९७३ वर गेला होता. मागील काही दिवसांत यात झपाट्याने घसरण झाली आहे.

असा घसरला रुग्ण दुपटीचा कालावधी -
२५ मे - ३९७३
१ जून - २०२७
२ जून - १७६५
३ जून - १५७६
४ जून - १३९६
५ जून - १२०४
६ जून - १०५१
७ जून - ९८६
८ जून - ८६६
९ जून - ७३३
१० जून - ६४२
११ जून - ५६१

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.