ETV Bharat / city

मुंबईत धारावी, अंधेरीसह कुर्ला येथे सर्वाधिक कोरोनाच्या मृत्यूंची नोंद

मुंबईत 4 जुलैला कोरोनाचे 80803 रुग्ण होते. त्यापैकी 52963 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 23248 ऍक्टिव्ह रुग्ण होते. मुंबईत झालेल्या 4592 मृत्यूंपैकी धारावी, माहिम, दादर येथील जी नॉर्थ विभागात 379, अंधेरी पूर्व येथील के ईस्ट विभागात 351 तर कुर्ला एल विभागात 349 सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

mumbai corona death
मुंबईत धारावी, अंधेरीसह कुर्ला येथे सर्वाधिक कोरोनाच्या मृत्यूंची नोंद
author img

By

Published : Jul 6, 2020, 6:27 AM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेल्या तीन महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. महानगरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही रोजच वाढत आहे. येथील धारावी, माहिम, दादर, अंधेरी पूर्व व कुर्ला या विभागात सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. तर फोर्ट, कुलाबा, सॅन्डहर्स्ट रोड येथे सर्वात कमी मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

मुंबईत 4 जुलैला कोरोनाचे 80803 रुग्ण होते. त्यापैकी 52963 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 23248 ऍक्टिव्ह रुग्ण होते. मुंबईत झालेल्या 4592 मृत्यूंपैकी धारावी, माहिम, दादर येथील जी नॉर्थ विभागात 379, अंधेरी पूर्व येथील के ईस्ट विभागात 351 तर कुर्ला एल विभागात 349 सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर सर्वाधिक कमी मृत्यू फोर्ट कुलाबा येथील ए विभागात 48, सॅन्डहर्स्ट रोड येथील बी विभागात 60, मरिन लाईन्स येथील सी विभागात 61, आर नॉर्थ विभागत 64 मृत्यूंची नोंद झाली आहे.

मुंबईचा मृत्युदर 5.83 टक्के -

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मृत्यूंची संख्या कमी ठेवण्यात पालिकेला यश आले होते. मात्र, कोरोनाच्या मृत्यूंची आकडेवारी लपवल्याचा आरोप पालिकेवर झाला. राज्य सरकारच्या आदेशाने 16 जूनला 862 मृत्यूंची नोंद पालिकेला करावी लागली. यामुळे मुंबईतील मृत्यू दर 3.3 वरून 5.83 टक्क्यांवर गेला आहे. देशाचा मृत्यूदर 3 टक्के आणि राज्याचा मृत्यूदर 4.5 असताना मुंबईचा मृत्युदर 5.83 टक्के असल्याने हा दर कमी करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

मृत्यू रोखण्यासाठी पालिकेच्या उपाय योजना -

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब आदी दीर्घ आजार असल्यास त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तसेच 60 वर्षांवरील रुग्णांचा रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने मृत्यू होतो. दिर्घ आजार व वयोवृद्धांना कोरोनाची लागण होऊन त्यात त्यांचा मृत्यू होत असल्याने मृत्यू दारात वाढ झाली आहे. पालिका रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांनी टीम वर्क करून रुग्णांवर उपचार करण्यास सांगण्यात आले आहे. डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. रात्री 1 ते पहाटे 5 या वेळेत रुग्ण ऑक्सिजन काढून बाथरूमला जात असल्याने कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. असे मृत्यू टाळता यावेत म्हणून रुग्णांना बेडजवळ पॉट देण्यास सांगण्यात आले आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यास व्हिडिओ ऑडिट करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सर्व पालिका रुग्णालयांना दिले आहेत.

सर्वाधिक मृत्यू झालेले वॉर्ड -

वॉर्डचे नाव - रुग्ण - डिस्चार्ज - मृत्यू - ऍक्टिव्ह
जी नॉर्थ। - 5156 - 3572 - 379 - 1205
के ईस्ट - 5660 - 3056 - 351 - 2253
एल - 4257 - 3391 -349 - 517

सर्वात कमी मृत्यू झालेले वॉर्ड -

ए 1894 - 1359 - 48 - 487
बी 798 - 472 - 60 - 266
सी 1114 - 792 - 61 - 261
आर नॉर्थ 1841 - 1070 - 64 - 707

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.