ETV Bharat / city

कोरोनामुळे यंदा अनेक सेलिब्रिटींनी बाप्पाकडे फिरवली पाठ - नाना पाटेकर

14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचे लाड पुरवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी दरवर्षी न चुकता गणपतीची मूर्ती आपल्या घरी आणून तिची मनोभावे सेवा करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सेलिब्रेशनमध्ये बदल करण्याचा निर्णय अनेक सेलिब्रिटींनी घेतला आहे.

celebrity ganesh festival
कोरोनामुळे यंदा अनेक सेलिब्रिटींनी बाप्पाकडे फिरवली पाठ
author img

By

Published : Aug 22, 2020, 12:56 PM IST

मुंबई - 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचे लाड पुरवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी दरवर्षी न चुकता गणपतीची मूर्ती आपल्या घरी आणून तिची मनोभावे सेवा करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सेलिब्रेशनमध्ये बदल करण्याचा निर्णय अनेक सेलिब्रिटींनी घेतला आहे.

नाना पाटेकर

यात सगळ्यात पहिलं नाव आहे. अभिनेता नाना पाटेकरचं, नानाच्या घरचा गणपती म्हणजे मीडियापासून सर्वसामान्य लोकांपर्यंत सगळ्यांना त्याच आकर्षण, नानाच्या वडिलांनी सुरू केलेली परंपरा पुढे आईच्या सांगण्यावरून नानाने एवढी वर्ष तहह्यात पाळली. मात्र गतवर्षी आईंच निधन झालं; आणि त्यानंतर नेमकं गणेशोत्सवावर कोरोनाच सावट आलं. त्यामुळे यंदा नानाने गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. 'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन लागल्यापासूनच नाना त्याच्या पुण्यातील फार्महाऊसवर आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा नाना फार्महाऊसवरच एखादी छोटीशी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करणार आहे.

celebrity ganesh festival
यंदा नानाने गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगेशकर घराणे

यात दुसरं नाव आहे मंगेशकर कुटूंबाच, मंगेशकर कुटूंबातील गणपती बाप्पाची कित्येक वर्षांची परंपरा आहे. यानिमित्ताने संपूर्ण मंगेशकर कुटूंब आवर्जून एकत्र येतं. मंगेशकरांच्या गणपती पुढे देशातील अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. लतादीदी, आशा, हृदयनाथ, उषा, मीना आशी सगळी मंगेशकर भावंड मोठ्या भक्तीभावाने गणरायाची सेवा करतात. दरवर्षी 10 दिवस बाप्पाचा मुक्काम मंगेशकरांकडे असतो. यंदा मात्र या परंपरेला छेद देत घरात ज्येष्ठ नागरिक जास्त असल्याने दीदींचा गणपती अवघे दीड दिवस शास्त्र म्हणून बसवला जाणार आहे.

celebrity ganesh festival
मंगेशकर कुटूंबातील गणपती बाप्पाची कित्येक वर्षांची परंपरा आहे.
गायक सुरेश वाडकर

दीदींप्रमाणेच गायक सुरेश वाडकर यांच्या 'आजिवासन गुरुकुल'मधील गणपती बाप्पा हा त्यांचप्रमाणेच त्यांचा शिष्यग्णांसाठी एक मोठा उत्सव असतो. बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज या दिवसात आवर्जून वडकरांच्या घरी येतात. यंदा मात्र त्यांनी घरातल्या घरात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांचा शिष्य स्वप्नील बांदोडकरच्या घरी यंदा गणपती बसवणार नसल्याचा निर्णय कुटूंबाने मिळून घेतला आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी यंदा गणपती बाप्पाची मूर्ती न आणता देवघरातील गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करून गणेशोत्सव साजरा करायचा निर्णय घेतला आहे.

celebrity ganesh festival
सुरेश वाडकर यांच्या 'आजिवासन गुरुकुल'मधील गणपती बाप्पा हा त्यांचप्रमाणेच त्यांचा शिष्यग्णांसाठी एक मोठा उत्सव असतो.
केदार जाधव आणि आदेश बांदेकर

याशिवाय दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडे गणपती बाप्पा येणार असला, तरीही सोसायटीच्या नियमावलीमुळे मोजक्या पाहुण्यांना त्याचे दर्शन घेता येणार आहे. सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि सगळ्यांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्याकडे गणपती येत असला तरीही त्यांनाही सोसायटी नियमावलीमुळे यंदा उत्सव साधेपणाने साजरा करायचा निर्णय घेतला आहे.

सोनू सूद

हजारो मजुरांना रेल्वे आणि विमानाने घरी सोडणाऱ्या बॉलिवूड अभिनेता सोनू सुदच्या घरी बाप्पा येणार असला तरीही सोसायटीच्या नियमावलीमुळे बाहेरील कुणाला दर्शन घेता येणार नाही. अशीच काहीशी परिस्थिती गायिका नेहा राजपालची देखील आहे. तिची राहती इमारत कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित झाल्याने यंदा ती तिचे पती आणि मुलगी असे तीनच जण घरातल्या घरात दीड दिवस गणेशोत्सव साजरा करणार आहेत.

अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या ठाण्यातील काकांकडे गणपती बाप्पाचं आगमन होत. गणेश चतुर्थीचा दिवस ती ठाण्यात असते. मात्र यंदा तिला स्वतःला देखील गणपती निमित्त काकांकडे जाण्यासाठी पत्र लिहून सोसायटीची परवानगी मागण्याची वेळ आली आहे.

एकूणच यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक बंधने आली आहेत. त्यामुळे गणरायाच्या सेवेत कोणतीही कुचराई न करणाऱ्या सेलिब्रिटीनी यंदा मात्र आपल्या उत्साहाला मुरड घातल्याचे चित्र पहायला मिळतंय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.