मुंबई - मनसेच पहिले महाअधिवेशन मुंबईतील गोरेगाव नेस्को येथे 23 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून त्या दिवशी हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेणारी मनसे नेत्यांची बैठक, शुक्रवारी मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगड कार्यालयात पार पडली.
हेही वाचा... 'कावळ्याच्या शापाने काही गुरं मरत नाहीत'
मनसेच्या महाअधिवेशला मोठ्या प्रमाणात राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हे अधिवेशन कसे असावे, अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चेला असावेत, यासाठी मनसेच्या बैठका सुरू आहेत. त्याच अनुशंगाने शुक्रवारी मनसेच्या पदाधिकाऱयांची बैठक राजगड येथील मुख्यालयात पार पडली असल्याची माहिती मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिली.
हेही वाचा... अखेर ठरलं! सोमवारी होणार मंत्रिमंडळाचा प्रलंबित शपथविधी
या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे आदी महत्वाचे नेते उपस्थित होते. आमचे हे अधिवेशन खूप मोठे असणार आहे. तसेच राज्यभरातील सर्व कार्यकर्ते या अधिवेशनाला येणार असून सर्व तयारी करण्यासाठी ही बैठक घेतल्याचे संदिप देशपांडे यांनी सांगितले.
हेही वाचा... पीएमसी घोटाळा; मुंबई पोलिसांकडून न्यायालयात स्वतंत्र आरोपपत्र दाखल