ETV Bharat / city

निसर्गाचे वरदान जपणे आपले आद्य कर्तव्य - उद्धव ठाकरे - UDDHAV THACKREY ON ENVOIRNMENT

निसर्ग वरदानाच्या रुपाने भेटला आहे तो जपणे आपले कर्तव्य आहे. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे जात आहोत का याचा विचार करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

uddhav thackrey
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 1, 2021, 5:44 PM IST

मुंबई - मुंबईच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून वन्यजीवांवर त्याचा किती आणि कसा परिणाम होत आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. जो निसर्ग वरदान रुपाने मिळाला आहे, तो जपणे आपले आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे जात आहोत का, याचा विचार करणेही गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वन्यजीव सप्ताह २०२१ चे उद्धाटन सोहळ्याप्रकरणी ते बोलत होते. यावेळेस महाराष्ट्रातील वन्यजीवांची माहिती सांगणारे ‘वाईल्ड महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

uddhav thackrey
निसर्गाचे वरदान जपणे आपले आद्य कर्तव्य
सह्याद्री अतिथीगृहावरील या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधानसचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक सर्वश्री सुनील लिमये, जी साईप्रकाश यांच्यासह वन विभागातील अधिकारी कर्मचारी आणि वन्य जीव प्रेमी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

विनाशाकडे जात आहोत का
मुंबईच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, त्याचा वन्यजीवांवर किती आणि कसा परिणाम होत आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. जो निसर्ग वरदानाच्या रुपाने भेटला आहे तो जपणे आपले कर्तव्य आहे. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे जात आहोत का याचा विचार करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. वन्यजीव सप्ताह २०२१ च्या उद्धाटन समारंभाच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने वन्य जीव संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचेही सादरीकरण करण्यात आले.
uddhav thackrey
‘वाईल्ड महाराष्ट्र’ पुस्तकाचे केले प्रकाशन
सादरीकरणातील महत्वाचे वैशिष्ट्ये
1) राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या २० टक्के वनक्षेत्र
2) भारतीय वन सर्वेक्षण अहवाल २०१७ व २०१९ नुसार अनुक्रमे ८२ चौ.किमी व १६ चौ किमी ने वाढले
3) पांढरी चिप्पी राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य
4) राज्यात ५० अभयारण्ये, १५ संवर्धन राखीव. भविष्यात १० संवर्धन राखीव घोषित करण्याचे नियोजन
5) समृद्धी महमार्गावर वन्यजीवासाठी १७९७ ओलांड मार्ग
6) राज्यात नांदूर मध्यमेश्वर आणि लोणार या २ रामसर साईट
7) ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी संवर्धन सप्ताहाचे राज्यात आयोजन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.