ETV Bharat / city

शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन - थोरात - कॉंग्रेसचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मुंबई

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांवर लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. हे जाचक कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत पोहोचला असून मागण्या मान्य होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत. या आंदोलनाला कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Congress agitation news mumbai
शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
author img

By

Published : Dec 3, 2020, 3:16 AM IST

मुंबई - केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांवर लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून, या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. हे जाचक कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत पोहोचला असून मागण्या मान्य होईपर्यंत ते मागे हटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

यासंदर्भात थोरात म्हणाले की, भाजप सरकारच्या या शेतकरीविरोधी कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवलेला आहे. हे काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मागील दोन महिने सातत्याने विविध आंदोलने केली, आंदोलनातून आपला विरोध व्यक्त केलेला आहे. किसान व्हर्च्युअल महामेळावा, किसान हक्क दिवस, जिल्ह्या-जिल्ह्यात धरणे आंदोलन, राजभवनवर पदयात्रा काढून राज्यपालांना निवेदन दिले, ट्रॅक्टर रॅली काढल्या, काळ्या कायद्याविरोधात सह्यांची मोहिम राबवण्यात आली. यात राज्यभरातील ६० लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी सहभाग नोंदवला होता. या आंदोलनातही मोठ्या संख्येने लोक सहभागी होऊन आपला विरोध व्यक्त करतील.

कृषी कायद्याला विरोध करत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एवटला आहे. सात दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या मनात या काद्याविषयी काही शंका आहेत त्यांच्याशी चर्चा करुन केंद्र सरकारने त्यांना आश्वस्त केले पाहिजे. भाजप सरकार जाहिरपणे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असे सांगत आहे, परंतु शेतकऱ्यांचे त्यातून समाधान होत नाही. भाजपाच्या कथनी आणि करनीमध्ये अंतर असल्याने शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. शेतकरी कृषी कायद्यात बदल करण्याची मागणी करत आहेत, त्याप्रमाणे केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबरपणे उभे आहोत, असेही थोरात यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.