ETV Bharat / city

Nana Patole Meet Sharad Pawar : शरद पवारांच्या भेटीनंतर नाना म्हणाले - भाजपाला कसे उत्तर द्यायचे याची लवकरच दिशा ठरवू

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या रोजच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पटोले म्हणाले, की भाजपला कसे उत्तर द्यायचे यासंबंधी येत्या एक दोन दिवसांत चर्चा करुन दिशा ठरवली जाईल.

Nana Patole meet NCP President  Sharad Pawar
नाना पटोले यांनी घेतली शरद पवारांची भेट
author img

By

Published : Apr 8, 2022, 12:56 PM IST

मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress Maharashtra President Nana Patole ) यांनी आज (शुक्रवार) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांची मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरला भेट घेतली. या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. प्रामुख्याने राज्यात सध्या वीजेचा तुटवडा भासत असल्याने या विषयावर गांभीर्याने चर्चा केली असल्याचे ते म्हणाले.

वीजेचा प्रश्न गंभीर
याप्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यामध्ये सध्या लोडशेडिंगचे प्रमाण वाढले आहे. केंद्राने कोळसा न दिल्याने प्रकल्प बंद पडले आहेत, हा प्रश्न तातडीने कसा निकाली काढता येईल यासोबत केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने राज्यात काम करत आहेत याबाबत बैठकीत चर्चा झाली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

भाजपला कसे उत्तर द्यायचे?
राज्यात सध्या महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी नेत्यांवर कारवाई करत आहेत. याबाबत भाजपला कसे उत्तर द्यायचे? याबद्दल येत्या एक दोन दिवसात चर्चा करून पुढची दिशा ठरवू असेही नाना पटोले म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत
हा विषय आमच्या पातळीवरचा नाही. हायकमांड निर्णय घेईल. त्याचसोबत महामंडळ वाटप यावर देखील चर्चा झाली. दोन ते तीन दिवसात आम्ही एकत्र येऊ आणि मग चर्चा करू असे नाना म्हणाले. तसेच आयएनएस विक्रांत जहाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी जी वर्गणी गोळा केली होती त्याचा ही प्रश्न आहे. परंतु विषयाला वेगळे वळण देण्याची प्रक्रिया सुरू असून हा पैशाचा प्रश्न आहे, याचे उत्तर भाजप का देत नाही आहे? असा प्रश्न ही नाना यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : Income Tax Raid : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्तांवर आयकर विभागाची टाच, हवालामार्गे पैशांचा व्यवहार झाल्याचा संशय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.