ETV Bharat / city

राज्यात 'यात्रा' बंद करून दुष्काळ जाहीर करा - विजय वडेट्टीवार

राज्यात मराठवाडा, विदर्भात पाऊस पडत नसल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. जी पिके लावण्यात आली त्यांना पाणी मिळाल्याने ती करपली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती काहीही पडणार नाही. यामुळे राज्यात सत्ताधारी पक्षाकडून काढण्यात येत असलेल्या 'यात्रा' बंद करून दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली.

राज्यात 'यात्रा' बंद करून दुष्काळ जाहीर करा - विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Jul 23, 2019, 9:50 PM IST

मुंबई - राज्यात असलेले सरकार हे केवळ लुटमार करण्यासाठी आले आहे. त्यामुळे त्यांना शेतकरी, सर्वसामान्य जनतेशी काहीही देणेघेणे उरलेले नाही, अशी जहरी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यात 'यात्रा' बंद करून दुष्काळ जाहीर करा - विजय वडेट्टीवार

वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रियेतील प्रमुख मुद्दे;

शेतकऱ्यांची दूवा नाही बददूवाच मिळणार आहे, त्यात हे सगळे साफ होतील

यात्रा काढणे एवढेच काम सरकार करत आहे. जनआशीर्वाद, महाजनादेश यात्रा काढत आहेत, मात्र आज राज्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकविमा मिळत नाही, कर्ज मिळाले नाही, दुसरीकडे पाउस पडत नाही, यामुळे यांना जन आशीर्वाद कसा मिळू शकेल, उलट शेतकऱ्यांची यांना बददूवाच मिळणार आहेत. त्यात हे सगळे साफ होतील, असे संतप्त विधान वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

भाजप-शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी भांडत बसले आहेत

राज्यात आज दुष्काळी परिस्थिती असताना हे लोक माझा मुख्यमंत्री, माझा मुख्यमंत्री, यासाठी भांडत बसले आहेत. त्यामुळे यांना सरकार कोणासाठी चालवायचे आहे, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपावर ते म्हणाले की,आमच्या बैठकीत जागा वाटपाचा प्रश्न हा अर्ध्याहून अधिक विषय सुटला आहे. उर्वरित विषयावरही आमच्या काही वाद निर्माण होणार नाही. ज्या जागांवर ज्यांची अधिक ताकद आणि निवडून येण्याचा अधिक विश्वास असेल त्या जागा या त्या - त्या पक्षांना दिल्या जाणार आहेत. यामुळे आमच्यासोबतच्‍या इतर घटक पक्षांच्या जागा वाटपाचाही विषय हा लवकरच सुटणार असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत जागा वाटप आणि त्याचा विषय सुटेल.

जागा वाटपावर केवळ जिंकून येणे हा एक फार्म्युला

जागा वाटपाच्या फार्म्युल्यावर विचारले असता ते म्हणाले की, आमचा जागा वाटपावर केवळ जिंकून येणे हा एक फार्म्युला ठरला आहे. त्यामुळे ज्यांची अधिक ताकद आहे, त्यांना त्या जागा देण्याचे आम्ही आघाडीत ठरवले आहे.. त्यामुळे कोणाला आधिक जागा हा विषय आमच्यासमोर नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपयांची मदत तसेच दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावेत, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Intro:राज्यात 'यात्रा' बंद करून दुष्काळ जाहीर करा - विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची मागणीBody:
राज्यात 'यात्रा' बंद करून दुष्काळ जाहीर करा - विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
mh-mum-congncp-mitting-vadettivar-byte-7201153

मुंबई, ता. २३ :

राज्यात मराठवाडा, विदर्भात पाऊस पडत नसल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. जी पिके लावण्यात आली त्यांना पाणी मिळाल्याने ती करपली असल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीही पडणार नाही, यामुळे राज्यात सत्ताधारी पक्षाकडून काढण्यात येत असलेल्या 'यात्रा' बंद करून दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपयांची मदत तसेच दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यात असलेले सरकार हे केवळ केवळ लुटमार करण्यासाठी आले आहे. म्हणूनच ते ज्या ठिकाणी अधिक पैसा खायला मिळतो, त्या मेट्रोसाठी नको तिथे निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्यांना शेतकरी, सर्वसामान्य जनतेशी काहीही देणेघेणे उरलेले नाही असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
यात्रा काढणे हे एवढेच यांचे काम आहे. जन आशीर्वाद, महाजनादेश यात्रा काढत आहेत, मात्र आज राज्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकविमा मिळत नाही, कर्ज मिळाले नाही, दुसरीकडे पाउस पडत नाही, यामुळे यांना जन आशीर्वाद कसा मिळू शकेल, उलट शेतकऱ्यांची यांना बददूवा मिळणार असून त्यात हे सगळे साफ होतील असे संतप्त विधानही वडेट्टीवार यांनी केला.
राज्यात आज दुष्काळी परिस्थिती असताना हे लोक माझा मुख्यमंत्री, माझा मुख्यमंत्री कोण यासाठी भांडत बसले आहेत. त्यामुळे यांना सरकार कोणासाठी चालवायचे आहे, असा सवालही त्यांनी केला.
काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपावर ते म्हणाले की, आज आमच्या झालेल्या बैठकीत जागा वाटपाचा प्रश्न हा अर्ध्याहून अधिक विषय सुटला आहे. उर्वरित विषयावरही आमच्या काही वाद निर्माण होणार नाही. ज्या जागांवर ज्यांची अधिक ताकद आणि निवडून येण्याचा अधिक विश्वास असेल त्या जागा या त्या - त्या पक्षांना दिल्या जाणार आहेत. यामुळे आमच्यासोबतच्‍या इतर घटक पक्षांच्या जागा वाटपाचाही विषय हा लवकरच सुटणार असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत जागा वाटप आणि त्याचा विषय सुटेल आणि त्याच दिवसांपासून आम्ही राज्यात प्रचाराला लागणार आहोत अशी मागणी वडेट्टीवार यांनी दिली.
जागा वाटपाच्या फार्म्युल्यावर विचारले असता ते म्हणाले की, आमचा जागा वाटपावर केवळ जिंकून येणे हा एक फार्म्युला ठरला आहे. त्यामुळे ज्यांची अधिक ताकद आहे, त्यांना त्या जागा देण्याचे आम्ही आघाडीत ठरवले आहे.. त्यामुळे कोणाला आधिक जागा अधिक हण्यात हा विषय आमच्यासमोर नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.