ETV Bharat / city

एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा - श्रीरंग बरगे - श्रीरंग बरगे

भोळ्याभाबड्या एसटी कर्मचाऱ्यांना ( MSRTC Workers ) खोटी आशा दाखवून न्यायालयाचा निर्णय जसाच्या तसे न सांगता दिशाभूल करून राजकीय भावनेने व द्वेषाने ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या राहत्या घरावर हल्ला करण्यास ( Silver Oak ) प्रवृत्त करणाऱ्या तथाकथित नेतृत्वाला जबर शिक्षा करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

ST
ST
author img

By

Published : Apr 9, 2022, 10:13 PM IST

मुंबई - भोळ्याभाबड्या एसटी कर्मचाऱ्यांना ( MSRTC Workers ) खोटी आशा दाखवून न्यायालयाचा निर्णय जसाच्या तसे न सांगता दिशाभूल करून राजकीय भावनेने व द्वेषाने ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या राहत्या घरावर हल्ला करण्यास ( Silver Oak Attack ) प्रवृत्त करणाऱ्या तथाकथित नेतृत्वाला जबर शिक्षा करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे ( Shrirang Barge ) यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांची दिशाभूल - श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सुस्पष्ट व सकारात्मक असल्याने तसेच या निर्णयापूर्वीच सरकारने एक मागणी वगळता इतर सर्व मागण्या मान्य केल्याने त्या दोघांच्या निर्णयाचा आदर राखत लवकरच सर्व एसटी कर्मचारी आपल्या कामावर रुजू होतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत असतानाच त्यांची दिशाभूल केली जाते आहे. भविष्यात एसटीचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाने पालकत्वाची भूमिका स्वीकारावी आणि कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्याही तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिलेली सुधारित वेतन वाढ ही सर्व कर्मचाऱ्यांना सारखी नसून, त्यामधील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. त्या परिवहन मंत्री अनिल परब ( Minister Anil Parab ) नक्की दूर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय संरक्षण देण्याच्या दृष्टीने "मेडिक्लेम" योजना त्वरित अमलात आणावी, अशी देखील मागणी यांनी यावेळी केली.

भरीव आर्थिक निधीची तरतूद करेल - पुढील चार वर्षे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा जबाबदारी आणि हमी राज्य शासनाने उचलली आहे. याबद्दल बरगे यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. आहेत. याबरोबरच एसटीच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक निधीची तरतूद प्रत्येक अर्थसंकल्पात करणे गरजेचे आहे, असे बरगे यांनी सांगितले.

हेही वाचा - Gunaratna Sadavarte Police Custody : गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी, 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.