मुंबई - महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने काँग्रेसच्या दादर येथील टिळक भवन कार्यालयात महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी यांच्या बाबत बोलत असताना नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांचा वध केला ( Mahatma Gandhi Killed By Nathuram Godase ) असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांच्या कडून करण्यात ( Nana Patole On Gandhi Killing ) आले.
गांधी विचार देशाला पुढे नेतील
देशातला पहिला आतंकवादी नथुराम गोडसे आज सर्वांसमोर आला. मात्र, महात्मा गांधी यांचा विचार देशाला पुढे नेण्यासाठी, देशाला महासत्ता बनवण्यासाठी आहे, असा ठाम विश्वास जनतेचा असल्यासही ते या भाषणात म्हणाले.
नानांच्या पोटात होतं ते ओठावर आलं
नाना पटोले यांना बोलताना काहीही भान राहत नाही. त्यांनी केलेल्या या वक्तव्याची आम्ही निंदा करतो. मात्र, त्यांच्या जे पोटात होते तेच ओठावर आले का? नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याबाबत तमाम महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar Criticized Nana Patole ) यांनी केली आहे.
भाजपवाले गोडसे मुर्दाबाद म्हणतील का?
भाजपचे नेते दुतोंडी आहेत. नरेंद्र मोदी बेटी पढाओ बेटी पटाओ तेव्हा स्लीप अॅाफ टंग आणि नाना भाऊंच्या तोंडातून हत्या ऐवजी वध असा एक शब्द चुकून गेला तर भाजपवाले म्हणतात त्यांच्या मनात तेच आहे. मग मोदींच्याही मनात तेच होते का? नथुराम गोडसे दहशतवादी होता. त्याने राष्ट्रपित्याचा खून केला. नाना भाऊ एकदा नाही हजार वेळा गोडसे मुर्दाबाद म्हणतील. भाजपाचे किती नेते गोडसे मुर्दाबाद म्हणू शकतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे.