ETV Bharat / city

सुशांत प्रकरण : लंडनला पळण्याच्या तयारीत संदीप सिंह? भाजप कार्यालयात केला ५३ वेळा फोन

author img

By

Published : Aug 29, 2020, 11:03 AM IST

पीएम मोदी चित्रपटाचा निर्माता 'संदीप सिंह याने महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात १ सप्टेंबर ते २३ डिसेंबर २०१९ या काळात तब्बल ५३ वेळा फोन केला होता. त्यावरून सावंत यांनी संदीप सिंह हा भाजपच्या कार्यालयात नेमका कोणाशी बोलायचा? भाजपमध्ये संदीप सिंहचा 'हँडलर' कोण आहे? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात भाजपच्या संबंधाची चौकशीची मागणी केली आहे.

BJP connection with Sushant
संदिप सिंह

मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात नाव आलेल्या चित्रपट निर्माता संदीप सिंह याच्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. संदीप सिंह याचे भाजपशी जवळचे संबंध असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सिंह हा लंडनला पळून जाण्याच्या तयारीत असून त्याने महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात तब्बल ५३ वेळा फोन केले असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे.

पीएम मोदी चित्रपटाचा निर्माता संदीप सिंह याने महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात १ सप्टेंबर ते २३ डिसेंबर २०१९ या काळात तब्बल ५३ वेळा फोन केला होता. त्यावरून सावंत यांनी संदीप सिंह हा भाजपच्या कार्यालयात नेमका कोणाशी बोलायचा? भाजपमध्ये संदीप सिंहचा 'हँडलर' कोण आहे? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात भाजपच्या संबंधाची चौकशीची मागणी केली आहे.

याच बरोबर सचिन सावंत यांनी संदिप सिंह आणि भाजप यांचे संबंध दर्शवणारे आणखी तीन प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. सचिन सावंत म्हणतात की, २०१८ मध्ये संदीप सिंह हा भारतीय दूतावासाच्या परवानगीने मॉरिशसला गेला होता. त्यावेळी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा संदीप सिंह याच्यावर आरोप आहे. त्या प्रकरणाचे पुढे काय झाले? का मोदी सरकारने त्याला वाचवले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या आरोपाची एक प्रतही त्यांनी ट्विटमध्ये जोडली आहे.

याशिवाय पीएम मोदी हा चित्रपट बनविण्यासाठी अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचे आरोप असलेल्या व्यक्तीचीच भाजपने का निवड केली आणि त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना कसा काय सपोर्ट केला? असाही प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे.

तसेच गुजरात सरकारने वाइब्रेंट गुजरात समिटमध्ये आगामी मोदींच्या बायोपिकसाठी संदीप सिंहच्या लेजेंड ग्लोबल स्टुडिओ या एकमेव चित्रपट निर्मात्या कंपनीसोबत तब्बल १७७ कोटी रुपयांचा करार केला. परंतु, इतर कोणत्या कंपनी नव्हत्या का? फक्त संदीपच्याच कंपनीची निवड का केली? असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला आहे.

अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करत सावंत यांनी चित्रपट निर्माता संदीप सिंह याचे भाजपशी जवळचे संबंध असल्याचा दावा केला आहे. तसेच या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो केला होता ट्विट-

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी संदीप सिंह याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो ट्वीट केला होता. संदीप सिंहचे भाजपशी असलेल्या संबंधांची चौकशी व्हावी, अशी मागणी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.